Tata Hospital: टाटा रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलिस सतर्क; हॉस्पिटलचा परिसर केला रिकामा

Mumbai Police: मुंबईतील कॅन्सरचे सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या टाटा रुग्णालयाला धमकीचा मेल आला आहे. हे रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीनंतर टाटा रुग्णालय परिसर खाली करण्यात आला आहे.
Tata Hospital: टाटा रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलिस सतर्क; हॉस्पिटलचा परिसर केला रिकामा
Tata HospitalSaam Tv
Published On

Summary -

  • टाटा रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

  • धमकीनंतर मुंबई पोलिस सतर्क

  • पोलिसांनी तातडीने रुग्णालय परिसर रिकामा केला

  • बॉम्ब शोधक आणि श्वानपथकाकडून तपास सुरू

मुंबईतल्या टाटा रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिस सतर्क झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. ही धमकी येताच टाटा रुगालय परिसर रिकामा करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. ही धमकी कुठून आली आणि कुणी दिली याचा शोध पोलिस घेत आहेत.

परळमधील स्थानिक पोलिसांनी तातडीने टाटा रुग्णालयाचा ताबा घेतला असून परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॉम्ब शोधक पथकासह अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आहेत. सध्या रुग्णालयाची तपासणी केली जात आहे. श्वानपथकाच्या सहाय्याने रुग्णालयाच्या प्रत्येक मजल्याची आणि कानाकोपऱ्याची तपासणी केली जात आहे.

Tata Hospital: टाटा रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलिस सतर्क; हॉस्पिटलचा परिसर केला रिकामा
Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. टाटा रुग्णालय हे देशातील कॅन्सरवर उपचार करणारे सर्वात मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात देशभरातून मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात. या धमकीमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. टाटा रुग्णालय आणि परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे. रुग्णालय परिसरात कुणीही येऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tata Hospital: टाटा रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलिस सतर्क; हॉस्पिटलचा परिसर केला रिकामा
Train Bomb Threat : मुंबईहून निघालेल्या ट्रेनमध्ये बॉम्ब, त्या मेसेजनंतर एकच खळबळ, पण...

यापूर्वी देखील टाटा रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. आता पु्न्हा धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे ही फक्त अफवा आहे की कुणी घातपात घडवण्याचा प्रयत्न करत आहे याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. रुग्णालयात येणाऱ्या आणि आसपास राहणाऱ्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tata Hospital: टाटा रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलिस सतर्क; हॉस्पिटलचा परिसर केला रिकामा
Pune Bomb Threat: पुण्यातील 5 स्टार हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल, धमकीनं पोलिसांची झोप उडाली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com