Crime News : दारू पाजली, डोळ्यात मिरची पावडर फेकली, नंतर हंटर आणि दगडाने ठेचलं; प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या

Dharashiv Crime News : धाराशिवमध्ये अनैतिक संबंधांत अडथळा ठरल्याने प्रियकराने व पत्नीने मिळून पतीची दारू पाजून, डोळ्यात मिरची पावडर टाकून आणि हंटर, दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी २४ तासात आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Crime News : दारू पाजली, डोळ्यात मिरची पावडर फेकली, नंतर हंटर आणि दगडाने ठेचलं; प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या
Dharashiv Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • कोरेगाववाडी बायपास रोडवर शाहूराज सूर्यवंशी यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला

  • पत्नीच्या चौकशीत त्रिकोळीतील शिवाजी दूधनाळे याच्यासोबत अनैतिक संबंधांचा खुलासा

  • दारू पाजून, डोळ्यात मिरची पावडर टाकून हंटर व दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली

  • उमरगा पोलिसांची २४ तासात जलद कारवाई

बालाजी सुरवसे, धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील बायपास लगतच्या कोरेगाववाडी रस्त्याच्या कडेला रविवारी पहाटेच्या सुमारास शहरातील एका इसामाचा धारदार हत्यार व दगडाने ठेचून अत्यंत निर्दयीपणे खून केल्याची घटना घडली होती ही घटना अनैतिक संबंधांतून झाल्याचे निष्पन्न झाले असून उमरगा पोलिसांनी घटना घडल्या नंतर अवघ्या चोवीस तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दिनांक ४ रोजी पहाटे सहाच्या सुमारास कोरेगाव रोड लगत एका इसमाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत नागरिकांना दिसला. हा मृतदेह हा शहरातील जुनीपेठ येथील शाहूराज महादू सूर्यवंशी यांचा असल्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे जोराने फिरवत तांत्रिक बाबीच्या आधारे २४ तासात खुनाचा उलगडा केला .

Crime News : दारू पाजली, डोळ्यात मिरची पावडर फेकली, नंतर हंटर आणि दगडाने ठेचलं; प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या
BMC Election : उबाठा - मनसे युतीत धुसफूस; राज ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचाराला ठाकरेसेनेचे पाठबळ नाही

अनैतिक संबंधातून पतीची हत्या

मृत शाहूराज यांची पत्नी यांची सखोल चौकशी केली असता तिचे त्रिकोळी येथील शिवाजी दत्तू दूधनाळे यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचं उघडं झालं. याच प्रकारातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास त्रिकोळी येथील आरोपी शिवाजी दत्तू दूधनाळे यांना ताब्यात घेतले. मृतक शाहूराज महादू सूर्यवंशी यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला. तपासात समोर आले की, शाहूराज यांची पत्नी आणि आरोपी शिवाजी दत्तू दूधनाळे यांच्यात गेल्या एक ते दीड वर्षांपासून अनैतिक संबंध होते. यामुळे मृत शाहूराज आणि त्याची गौरी यांच्यात सतत भांडण होत होती.

Crime News : दारू पाजली, डोळ्यात मिरची पावडर फेकली, नंतर हंटर आणि दगडाने ठेचलं; प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या
Kalyan : वेळ ठरली, तारीख ठरली, सिनेस्टाईल सापळा रचून पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या कल्याण पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कसा रचला गेला हत्येचा कट?

आपल्या संबंधांत अडथळा ठरत असल्याने मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराने शाहूराजचा कायमचा काटा काढण्याचं ठरवलं. आरोपी शिवाजी आणि गौरी यांनी संगनमताने रविवारी पहाटे हत्येचा कट रचला. आरोपी शिवाजी याने मृत शाहूराज याला रविवारी दारू पाजली. त्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बायपास जवळच्या कोरेगाववाडी येथील रस्त्यावर नेऊन शाहूराजच्या डोळ्यात मिरची पावडर घालून त्याला रस्त्यावर पाडलं. नंतर संधी साधून आरोपी शिवाजीने शाहूराजच्या डोक्यात हंटर आणि दगडाने जबर मारहाण केली. यात शाहूराज सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com