Kalyan : वेळ ठरली, तारीख ठरली, सिनेस्टाईल सापळा रचून पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या कल्याण पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Kalyan Dombivli Crime News : कल्याण पूर्व नेतीवली परिसरात अवैध स्टील पिस्टल बाळगून फिरणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला सापळा रचून अटक करण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कोळसेवाडी पोलिस सतर्क आहेत.
Kalyan : वेळ ठरली, तारीख ठरली, सिनेस्टाईल सापळा रचून पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या कल्याण पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Kalyan Dombivli Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • KDMC निवडणुकीपूर्वी कल्याण पूर्वमध्ये पोलिसांची मोठी प्रतिबंधात्मक कारवाई

  • नेतीवलीत सापळा रचून २१ वर्षीय तरुणाला अवैध स्टील पिस्टलसह अटक

  • सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप भालेराव पुढील तपास करत

  • अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार

संघर्ष गांगुर्डे, कल्याण- डोंबिवली

एकीकडे राज्याच्या राजकारणात पक्षा पक्षांमध्ये तणाव सुरु असताना दुसरीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सज्ज आहेत. कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेतीवली परिसरात अवैधरित्या पिस्टल घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. करण जितु निशाद वय २१ वर्ष डोंबिवली पूर्व असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेतीवली परिसरात एक इसम पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे दिनांक ०६ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास नेतीवली, कल्याण पूर्व येथील जुने धान्य गोदामाजवळ सापळा रचण्यात आला.

Kalyan : वेळ ठरली, तारीख ठरली, सिनेस्टाईल सापळा रचून पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या कल्याण पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Shocking : कामावर गेला तो परतलाच नाही, लोणावळ्यात ७०० फूट खोल दरीत सापडला मृतदेह, लायन्स पॉईंटवर नेमकं काय घडलं?

संशयित इसमाला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक स्टील धातूचे पिस्टल आढळून आले. आरोपीकडून अंदाजे २५ हजार रुपये किमतीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Kalyan : वेळ ठरली, तारीख ठरली, सिनेस्टाईल सापळा रचून पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या कल्याण पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे भगव्याआड लपलेला सैतान, शिंदेंसेनाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्या एवढं, ठाकरेंच्या आमदाराचं वक्तव्य

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव करीत आहेत. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस सज्ज झाले आहेत. जागोजागी पोलिसांची करडी नजर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com