Maharashtra Politics : एकनाथ शिंदे भगव्याआड लपलेला सैतान, शिंदेंसेनाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्या एवढं, ठाकरेंच्या आमदाराचं वक्तव्य

Akola Nitin Deshmukh Statement News : अकोला महापालिका प्रचारसभेत उबाठा आमदार नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘सैतान’ आणि ‘गद्दार’ असा उल्लेख केला आहे. दरम्यान त्यांच्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापणार आहे.
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे भगव्याआड लपलेला सैतान, शिंदेंसेनाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्या एवढं, ठाकरेंच्या आमदाराचं वक्तव्य
Akola Nitin Deshmukh Statement News Saam Tv
Published On
Summary
  • अकोल्यात प्रचारसभेत बोलताना नितीन देशमुखांची जीभ घसरली

  • एकनाथ शिंदेंवर ‘सैतान’, ‘गद्दार’ टिप्पणीमुळे नवा वाद

  • शिंदे गटाचे आयुष्य कोंबडीच्या आयुष्या एवढं - नितीन देशमुख

  • आरक्षणावरून मुख्यमंत्री फडणवीसांवर समाजात फूट पाडल्याचा नितीन देशमुखांचा आरोप

अक्षय गवळी, अकोला

राज्यात सगळेच पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळतं आहे. अशातच अकोला जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण चांगलच तापलआहे. उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांचा 'सैतान' असा उल्लेख केला आहे. शिवाय कोंबडीच्या आयुष्या एव्हढं शिंदे गटाचे आयुष्य असल्याचं नितीन देशमुख म्हणाले. नितीन देशमुख यांच्या या वक्तव्यामुळं आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

अकोला महापालिकेच्या ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या उमरीतील प्रचारसभेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बोलताना महायुतीवर टीका टिपण्णी केली आहे. एकनाथ शिंदे हे भगव्याच्या आड लपलेला 'सैतान' असल्याचं देशमुख म्हणालेत. त्यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख गद्दार आणि सैतान असा केला. त्यांच्या पक्षाचं आयुष्य हे कोंबडीच्या आयुष्याएव्हढं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. ज्या दिवशी भाजप त्यांना कापून खाईन त्या दिवशी त्यांचं आयुष्य संपणार असून शिंदेंची शिवसेना ही हिंदुत्वाची मतं खाण्यासाठी भाजपने उभी केलेली पार्टी असल्याचा घणाघात त्यांनी केला.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे भगव्याआड लपलेला सैतान, शिंदेंसेनाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्या एवढं, ठाकरेंच्या आमदाराचं वक्तव्य
Nagpur Crime : मैत्रिणीच्या नावाने चिडवलं म्हणून संतापला, जवळच्या मित्राला जीव जाईपर्यंत मारलं; नागपुरातील धक्कादायक प्रकार

पुढे बोलताना देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक वक्तव्य केले आहे , आता राज्यात महापालिका निवडणुका सुरू झाल्या, तिकडं मुख्यमंत्र्यांनी समाजात फूट पाडण्याचं काम वर्षभरापासून सुरू केले असल्याचं त्यांनी म्हटलं.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे भगव्याआड लपलेला सैतान, शिंदेंसेनाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्या एवढं, ठाकरेंच्या आमदाराचं वक्तव्य
Shocking : कामावर गेला तो परतलाच नाही, लोणावळ्यात ७०० फूट खोल दरीत सापडला मृतदेह, लायन्स पॉईंटवर नेमकं काय घडलं?

देशमुख म्हणाले, या मुख्यमंत्र्यांकडून ओबीसी, मराठा, एससी, एनटी समाजातं आरक्षणासाठी भांडण लावली गेली आणि राज्यातली भोळी जनता आरक्षणासाठी रस्त्यावर उतरली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा भाजपने दिला. त्याला मतदार बळी पडला. मात्र, आता महापालिका निवडणुकीत 'बटेंगे तो कटेंगे'चा विशेष पूर्णतः बंद झाला आहे. म्हणून जाती जातीत आरक्षणासाठी भांडण लावणारा कदाचित हा पहिला मुख्यमंत्री असल्याचेही आमदार देशमुख म्हटले. दरम्यान देशमुखांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राज्याचं राजकारण अधिक तापणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com