BMC Election : उबाठा - मनसे युतीत धुसफूस; राज ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचाराला ठाकरेसेनेचे पाठबळ नाही

Mumbai Municipal Election : अंधेरी पश्चिम प्रभाग ६७ मध्ये मनसे–शिवसेना (ठाकरे गट) युती असूनही स्थानिक शिवसेना नेतृत्व प्रचारापासून दूर असल्याचा आरोप आहे. कुशल धुरी यांनी राज ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.
BMC Election : उबाठा - मनसे युतीत धुसफूस; राज ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचाराला ठाकरेसेनेचे पाठबळ नाही
Mumbai Municipal ElectionSaam Tv
Published On
Summary
  • अंधेरी पश्चिम प्रभाग ६७ मध्ये मनसे–शिवसेना (ठाकरे गट) युतीत अंतर्गत नाराजी

  • मनसे उमेदवार कुशल धुरी सक्रिय प्रचारात असले तरी शिवसेनेची स्थानिक साथ कमी

  • शिवसेना शाखाप्रमुख दीपक सणस यांची अपक्ष उमेदवारीमुळे युतीसमोर आव्हान

  • कुशल धुरी यांची राज ठाकरे यांच्याकडे तक्रार; मनसे कार्यकर्त्यांत असंतोष

संजय गडदे, मुंबई

मुंबई महानगरपालिकेसह ठाणे, नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली आदी अनेक महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात युती झाली आहे. या युतीअंतर्गत मुंबई महानगरपालिकेत मनसेला ५२ जागा देण्यात आल्या असून, या निर्णयामुळे मनसेमधील अनेक इच्छुक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. परिणामी काही पदाधिकारी नाराज होऊन मनसेला रामराम ठोकत असल्याचे चित्रही समोर आले आहे.

दरम्यान, अंधेरी पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक ६७ मध्ये मनसेकडून मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष कुशल धुरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच कुशल धुरी यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून, घराघरांत जाऊन मतदारांशी संपर्क साधला जात आहे. मात्र, या प्रचारात स्थानिक शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित साथ मिळत नसल्याने कुशल धुरी प्रचारात एकाकी पडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

BMC Election : उबाठा - मनसे युतीत धुसफूस; राज ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचाराला ठाकरेसेनेचे पाठबळ नाही
Winter Alert : राज्यात थंडीचा कडाका वाढला! विदर्भातील किमान तापमान सर्वाधिक कमी; वाचा हवामानाचा अंदाज

या पार्श्वभूमीवर उमेदवार कुशल धुरी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून, स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबाबत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे. मुंबईत शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची महाआघाडी असतानाही प्रत्यक्ष मैदानात शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी प्रचारात उतरलेले दिसत नसल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

BMC Election : उबाठा - मनसे युतीत धुसफूस; राज ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचाराला ठाकरेसेनेचे पाठबळ नाही
Viral Video : हातावर भाकर घेतली, त्यावर थुंकला; बड्या हॉटेलमधील कुकचा किळसवाणा प्रकार, पाहा VIDEO

या असंतोषाला आणखी धार देणारी बाब म्हणजे, याच मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट) चे शाखाप्रमुख दीपक सणस यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली असून, काही शिवसेना पदाधिकारी पडद्यामागून दीपक सणस यांच्या समर्थनार्थ प्रचार करत असल्याचे चित्र मतदारसंघात पाहायला मिळत आहे. यामुळे महाआघाडीच्या उमेदवाराला प्रत्यक्ष नुकसान होत असल्याचा आरोप मनसेकडून केला जात आहे.

BMC Election : उबाठा - मनसे युतीत धुसफूस; राज ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचाराला ठाकरेसेनेचे पाठबळ नाही
Nagpur Crime : मैत्रिणीच्या नावाने चिडवलं म्हणून संतापला, जवळच्या मित्राला जीव जाईपर्यंत मारलं; नागपुरातील धक्कादायक प्रकार

मात्र, दुसरीकडे मनसैनिक, शिवसैनिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अनेक कार्यकर्ते प्रचारात सक्रियपणे सहभागी होत असून, मतदारांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा कुशल धुरी यांनी केला आहे. “महाआघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे वातावरण सकारात्मक आहे. १५ तारखेला मोठ्या प्रमाणावर मतदान होईल आणि १६ तारखेला विजय आमचाच होईल. मुंबईचा महापौर देखील ठाकरे बंधूंच्या युतीचाच होईल,” असा ठाम विश्वास कुशल धुरी यांनी व्यक्त केला आहे.

BMC Election : उबाठा - मनसे युतीत धुसफूस; राज ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचाराला ठाकरेसेनेचे पाठबळ नाही
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे भगव्याआड लपलेला सैतान, शिंदेंसेनाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्या एवढं, ठाकरेंच्या आमदाराचं वक्तव्य

एकीकडे महाआघाडीची घोषणा आणि दुसरीकडे स्थानिक पातळीवरील बंडखोरी, अंतर्गत नाराजी व प्रचारातील दुटप्पी भूमिका यामुळे अंधेरी पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक ६७ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, येत्या काळात वरिष्ठ नेते या वादावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com