Viral Video : हातावर भाकर घेतली, त्यावर थुंकला; बड्या हॉटेलमधील कुकचा किळसवाणा प्रकार, पाहा VIDEO

Delhi Noida Viral Video : दिल्लीतील ग्रेटर नोएडामधील एका हॉटेलमध्ये रोटी बनवताना त्यावर थुंकतानाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू असून आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
Viral Video : हातावर भाकर घेतली, त्यावर थुंकला; बड्या हॉटेलमधील कुकचा किळसवाणा प्रकार, पाहा VIDEO
Delhi Noida Viral VideoSaam Tv
Published On
Summary
  • ग्रेटर नोएडातील हॉटेलमध्ये रोटीवर थुंकल्याचा व्हिडिओ व्हायरल

  • अन्न सुरक्षा आणि हॉटेल स्वच्छता नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचा दावा

  • नेटकऱ्यांकडून संताप आणि कठोर कारवाईची मागणी

  • पोलिस चौकशी सुरू

तुम्हीसुद्धा हॉटेल सेलिब्रेशनसाठी किंवा कुटुंबियांसोबत जेवायला जात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी. हॉटेलला जाऊन जेवण करणं चुकीची गोष्ट नाही. परंतु एखाद्या अस्वच्छ हॉटेलमध्ये जेवणं करणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. अशाच प्रकारचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. ग्रेटर नोएडा मधील एका हॉटेलमध्ये कुक रोटी बनवताना त्यावर थुकताना पाहायला मिळतो आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडाच्या दनकौर पोलीस स्टेशन परिसरातील बिलासपूर शहरात शनिवारी रात्री उशिरा हॉटेलजवळून जाणाऱ्या वाटसरूने एका हॉटेलमधील किळसवाणा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. या परिसरातील एक हॉटेल मालक रोट्या बनवताना त्या रोट्यांवर थुंकताना दिसला. हा किळसवाणा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video : हातावर भाकर घेतली, त्यावर थुंकला; बड्या हॉटेलमधील कुकचा किळसवाणा प्रकार, पाहा VIDEO
Sambhajinagar : धावत्या दुचाकीवरून तरुणाला खाली ओढलं, कारमध्ये टाकून पसार झाले; संभाजीनगरमध्ये अपहरणाचा थरार!

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, एका मोठ्या हॉटेलचा कुक रोट्या बनवत आहे. या दरम्यान रोट्या बनवताना तो त्या रोट्यांमध्ये थुंकत आहे. त्याच हाताने तो सगळ्या रोट्या घाणेरड्या पद्धतीने तयार करत असल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संतप्त प्रक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांनी हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. लोकांनी म्हटले आहे की हे, अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आहे आणि ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोका आहे. काही नेटकऱ्यांनी प्रशासनाने सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची नियमित तपासणी करावी अशी मागणीही केली. दनकौर पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक म्हणाले की, सध्या कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही, परंतु व्हायरल व्हिडिओची चौकशी केली जात आहे. पोलिस हॉटेलची ओळख पटवून देतील आणि मालक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करतील.. जर आरोप खरे आढळले तर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com