Crime News : धक्कादायक! पत्नी सोडून माहेरी गेली, पतीने दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली

Nanded Crime News : नांदेडमध्ये पत्नी सोडून गेल्याच्या नैराश्यात २ वर्षांच्या मुलासह पित्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सिंदखेड पोलिस तपास करत असून आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Crime News : धक्कादायक! पत्नी सोडून माहेरी गेली, पतीने दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली
Nanded Crime News Saam Tv
Published On
Summary
  • नांदेडमध्ये बाप-लेकाची आत्महत्या

  • पत्नी सोडून गेल्याच्या नैराश्यातून आत्महत्येचा प्राथमिक अंदाज

  • ५ जानेवारी रोजी सायंकाळी घटना घडली

  • सिंदखेड पोलिस तपास करत असून कारण अद्याप अस्पष्ट

सागर सूर्यवंशी, नांदेड

एका जन्मदात्याने पोटच्या मुलाला घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड मधून समोर आली आहे. सदर घटना ही सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहिली येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु असून बायको सोडून गेल्याच्या नैराश्येत पतीने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृतांची नावे विक्रम सुरेश मर्शेटवार (वर्षे ३०) आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा शिवाजी विक्रम मर्शेटवार अशी आहेत. विक्रम आणि त्यांच्या मुलाच्या मृत्यू नंतर मर्शेटवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विक्रम त्यांच्या मुलाला घेऊन राजेश संटी दिसलवार यांच्या शेतातील विहिरीजवळ घेऊन गेले. त्याच विहिरीत मुलाला घेऊन विक्रम यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. विक्रम आणि त्यांचा मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता त्यांना विक्रम आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह विहिरीत सापडला.

Crime News : धक्कादायक! पत्नी सोडून माहेरी गेली, पतीने दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली
Sambhajinagar : ५००० रूपयांची साडी फक्त ₹५९९ला, ऑफरच्या नादात महिलांची उडाली झुंबड, संभाजीनगरमध्ये चेंगराचेंगरी

विक्रम यांना दोन भाऊ, आई असा परिवार आहे. तर मृत विक्रम यांची पत्नी तिच्या माहेरी राहते. पत्नीच्या सोडून जाण्याने विक्रम यांनी नैराश्येत येऊन ही आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी विक्रमच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Crime News : धक्कादायक! पत्नी सोडून माहेरी गेली, पतीने दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे भगव्याआड लपलेला सैतान, शिंदेंसेनाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्या एवढं, ठाकरेंच्या आमदाराचं वक्तव्य

घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. मात्र अद्यापही विक्रमच्या आणि त्यांच्या मुलाच्या आत्महत्येचं खरं कारण समोर आलेलं नाही. विक्रम यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली असून गावातील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com