Crime News : भयंकर! आईचं काकासोबत लफडं, मुलाने दोघांना एकत्र पाहिलं; वडिलांना सांगण्याआधीच त्याला संपवलं

Dharashiv Crime News : धाराशिवमध्ये प्रेमसंबंधांच्या रागातून १३ वर्षीय मुलाची कुऱ्हाडीने हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी २४ तासांत अटक केली.
Crime News : भयंकर! आईचं काकासोबत लफडं, मुलाने दोघांना एकत्र पाहिलं; वडिलांना सांगण्याआधीच त्याला संपवलं
Dharashiv Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • १३ वर्षीय मुलाची हत्या चुलत्यानेच कुऱ्हाडीने केली

  • अनैतिक प्रेमसंबंध उघड होण्याची भीती आणि राग

  • मृतदेह ५ दिवसांनी गवतामध्ये आढळला

  • पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक करून कट उघड केला

धाराशिवमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी इथ दिर भावजय यांच्या प्रेम संबंधांची माहिती वडिलांना पोहोचवत असल्याच्या रागातून एका निर्दयी चुलत्याने आपल्या १३ वर्षीय पुतण्याची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा वेगाने तपास करत काही तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ओमकार कांबळे असं आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तामलवाडी शिवारात कदम यांची शेती आहे. ती शेती दत्ता कोरे हा बटईने करत होता. सदर ठिकाणी उमरगा तालुक्यातील कोळसुर येथील ओमकार देवीदास कांबळे हा भावजयीला घेवून सालगडी म्हणून कामास होता. भावजयी ज्योती कांबळे हीचा १३ वर्ष वयाचा मुलगा कृष्णा सदानंद कांबळे हा कधी वडीलांकडे गावी तर कधी तिच्याजवळ राहायचा.

Crime News : भयंकर! आईचं काकासोबत लफडं, मुलाने दोघांना एकत्र पाहिलं; वडिलांना सांगण्याआधीच त्याला संपवलं
Nagpur Crime : मैत्रिणीच्या नावाने चिडवलं म्हणून संतापला, जवळच्या मित्राला जीव जाईपर्यंत मारलं; नागपुरातील धक्कादायक प्रकार

कृष्णाला आई आणि काकाच्या अनैतिक संबंधाबद्दल कळून चुकले होते. याबद्दल कृष्णा त्याच्या वडिलांना सांगणार होता. मात्र तत्पुर्वी कृष्णाचा काका ओंकार याने कृष्ण प्रेमात अडसर बनू नये म्हणून त्याचा काटा काढायचे ठरवले. त्यानुसार आरोपी १ जानेवारी रोजी दुपारी १२.00 च्या सुमारास तामलवाडी साठवण तलावामधील पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा पाईप बसवायचा म्हणून तलावामधे कृष्णाला घेवून गेला.

Crime News : भयंकर! आईचं काकासोबत लफडं, मुलाने दोघांना एकत्र पाहिलं; वडिलांना सांगण्याआधीच त्याला संपवलं
Ajit Pawar : अजित पवारांची झेडपीची तयारी, निवडणुकीआधी मारला मास्टरस्ट्रोक, पुण्यात १, २ नव्हे तर ३ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

आरोपी चुलत्याने कृष्णाला कुऱ्हाडीचा घाव घालून जिवे मारले आणि मृतदेह गवतामध्ये फेकुन तिथून पसार झाला होता. दरम्यान ५ जानेवारी रोजी धनाजी नेटके हे जनावरे चारत असताना गवतामधून पाय दिसून आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून हत्येचा कट उघडकीस आणला. या घटनेतील आरोपी ओंकार कांबळेला पोलिसांनी २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या घटनेतील पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com