
आधार कार्ड हा सर्वात महत्त्वाच्या भारतीय नागरिकांचा पुरावा मानला जातो. बँक खातं उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत याचा वापर होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, लहान मुलांसाठी निळ्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते? चला जाणून घेऊयात ५ महत्त्वाचे मुद्दे.
UIDAI कडून पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे बाल आधार कार्ड जारी केले जाते. यामध्ये मुलाचा फोटो, नाव आणि जन्मतारखेसारखी माहिती असते.
पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींच्या आधार नोंदणीमध्ये बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांची (Iris) माहिती घेतली जाते. त्यामुळे नियमित आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक तपशील नोंदवलेले असतात.
लहान मुलांचे बोटांचे ठसे आणि डोळ्यांची रचना पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे पाच वर्षांखालील मुलांचे फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन घेतले जात नाहीत.
मुलाचे बाल आधार कार्ड तयार करताना आई किंवा वडिलांपैकी एका पालकाच्या आधार क्रमांकाशी ते जोडले जाते. यामध्ये मुलाची वैयक्तिक माहिती आणि फोटो नोंदवला जातो.पाच वर्षांनंतर बायोमेट्रिक अपडेट केलेल्या मुलांच्या आधारमध्ये वयाची १५ वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.