overworked countries 2024 yandex
बिझनेस

Work Pressure:सर्वाधिक काम करणाऱ्यांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर, ५१ टक्के कर्मचारी आठवड्याला ४९ तास काम करताता, पाहा रिपोर्ट्समध्ये नेमकं काय?

overworked countries 2024: भारतामध्ये कर्मचाऱ्यांना राबवले जातेय, ओव्हरवर्क करणाऱ्यांमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर, आठवड्याला ४९ तास काम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतात सगळ्यांत जास्त लोकसंख्या आहे. प्रत्येक जण आपल्या पोटापाण्यासाठी कामाला जातात. भारत देश तसा कामाच्या बाबतीत खूप मेहनती आहे. इथे लोक ४९ तासांपेक्षा जास्त काम करतात. तसेच ५१ टक्के क्रमचारी हे ४९ टक्के काम करताना दिसले आहेत. हे (ILO)आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांनी आकडेवारी काढून सांगितले आहे. यामुळे भारत हा जागतिक स्थरावर जास्त काम करणाऱ्या देशापैंकी एक आहे. आता भारत एक अग्रगण्य राष्ट्र म्हणून सगळ्या देशांमध्ये मान उंचावणार आहे.

आठवड्याला भारतीय लोक किती तास काम करतात?

सगळ्या राष्ट्रांमध्ये भारतातले लोकचं आठवड्याला ४६.७ तास काम करतात. त्यामुळे भारताला बाकी राष्ट्रांच्या तुलनेत दर्जेदार स्थान दिले आहे. भारतातील तब्बल ५१% कर्मचारी दर आठवड्याला ४९ तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात. यामुळे भारताने जागतिक स्थरावरदुसरे स्थान पटकावले आहे . यात भुतानमध्ये सुद्धा ४९ तास कामासाठी आहेत. याची आकडेवारी कळली आहे. तसेच भुतानमध्ये ६१% कामगार वर्ग आहे. या व्यतिरिक्त बांग्लादेशात ४७% कर्मचारी वर्ग आहे. यांच्या कामाचे तास ४० तास इतके आहेत.

कोणकोणते देश TOP 10 मध्ये आहेत ?

भारताने तर ४९ तास काम करून रेकॉर्ड ब्रेक केलेच. त्याच सोबत पाकिस्तान , संयुक्त अरब राष्ट्र (यु ऐ ई) आणि लेसोथो यांनी देखील टॉप १० मध्ये आपले स्थान मिळवले आहे. या राष्ट्रांनी ५०.९ आणि ५०.४ तास करून त्यांचा हा मान मिळवला आहे. तर नेदरलॅंडमध्ये ३१.६ तास आणि नॉर्वेमध्ये ३३.७ तास कर्मचारी काम करत आहे. तिथे कामाच्या तासाचा आकाडा हा कमी आहे.

कामगार सरासरी २७ तास काम करायचे. मात्र हा आकडा आता कर्मचाऱ्यांनी वाढवला आहे. मात्र ओशनिया राष्ट्रात केवळ ४ टक्के लोकचं ४९ तास काम करतात. जे दक्षिण आशियात प्रचलित असलेल्या कामाच्या नैतिकतेच्या अगदी विरूद्ध आहे.

Edited By : Sakshi Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT