MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Mumbai News : मुंबईत राहून मराठी माणसाला काम देणार नाही, असं म्हणणाऱ्या एका युपीच्या माणसाला मनसेने चांगलाच चोप दिला आहे. यासगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

मुंबईत राहून मराठी आणि मुस्लिम माणसाला काम देणार नाही, असं म्हणणाऱ्या हिंदी भाषिक तरूणाला मनसेनं त्यांच्या स्टाईलमध्ये चांगलाच चोप दिलाय, आशिष पांडे नावाचा हा तरूण वेस्टर्न रेल्वे मार्गावर टीसी म्हणून कार्यरत आहे. मराठी माणसांबद्दल असं विधान केल्यानंतर मनसे स्टाईलने चोप दिला, आणि त्यानंतर आशिष पांडे याची अक्कल ठिकाणावर आलीय. यासंदर्भातील आशिष पांडे याचं फोनवरील संभाषण व्हायरल झालं होत. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईच्या विक्रोळी भागात हा आशिष पांडे नावाचा इसम राहतो. एका मराठी तरुणाने नोकरीसाठी केलेल्या फोनवरच्या त्याच्या भाषणात 'मी कधीच मराठी आणि मुस्लिम माणसाला काम देत नाही, कधीही अशा लोकांच्या रिक्षात बसत नाही. कायम युपीमधील चलकाच्या रिक्षात बसतो', अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या आशिष पांडे याला मनसे स्टाईल चोप दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com