Jugraj Singh: विजयी गोल करणाऱ्या खेळाडूचा जीवन जगण्यासाठी संघर्ष; भारत-पाकिस्तान बॉर्डरवर विकलं पाणी

Jugraj Singh: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने चीनचा 1-0 असा पराभव केला. टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात खेळाडू जुगराज सिंगचा महत्त्वाचा वाटा होता.
Jugraj Singh: विजयी गोल करणाऱ्या खेळाडूचा जीवन जगण्यासाठी संघर्ष; भारत-पाकिस्तान बॉर्डरवर विकलं पाणी
Jugraj SinghInstagram
Published On

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने चीनचा 1-0 असा पराभव केला. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला जुगराज सिंग ठरला. त्याने चौथ्या क्वार्टरच्या 51व्या मिनिटाला शानदार गोल करत टीम इंडियाला आघाडी मिळवून दिली. चीनने अंतिम सामन्यात टीम इंडियाला कडवी झुंज दिली पण जुगराजचा गोलने चीनचा धुव्वा उडवला.

भारतीय हॉकी संघ जेव्हाही जिंकतो तेव्हा कर्णधार हरमनप्रीत सिंगचे नाव चर्चेत असते. मात्र यावेळी भारत-पाकिस्तान सीमेवर एका छोट्या गावात जन्मलेल्या जुगराज सिंगच्या नावाची चर्चा सध्या होतेय. टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला हा जुगराज सिंग कोण आहे आणि त्याची हॉकी संघापर्यंत पोहोचण्याची कहाणी काय आहे, हे जाणून घेऊ. जुगराजचा संघर्ष वाचल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

जुगराजचं बालपण गेलंय भारत-पाकिस्तानच्या सीमेवर

जुगराज सिंह यांचा जन्म पंजाबमधील अटारी येथे झाला. अटारी हे भारत-पाकिस्तान सीमेवर आहे. येथे बहुतेकवेळा वारंवार गोळीबार होत असायचा. वारंवार होणाऱ्या गोळीबारीमुळे भारतीय लष्कराने गावतील लोकांना गाव सोडण्यास सांगितलं होतं. काही काळानंतर तेथील परिस्थिती सुधारली. परंतु जुगराज आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती.

Jugraj Singh: विजयी गोल करणाऱ्या खेळाडूचा जीवन जगण्यासाठी संघर्ष; भारत-पाकिस्तान बॉर्डरवर विकलं पाणी
Asian Hockey Champions Trophy 2024 : टीम इंडियाने पांचव्यांदा जिंकली आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी

आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जुगराजने भारत-पाकिस्तान सीमेवर पाण्याच्या बाटल्या विकल्या. तर त्याचे वडील सीमेवर कुली म्हणून काम करायचे. आपले जीवन सुधारण्यासाठी आणि हलाकीची परिस्थिती सुधारण्यासाठी जुगराजने हॉकीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्याने कोणत्याही मार्गदर्शकाशिवाय या खेळात आपले नाव कमावले. पाण्याची बाटली विकणारा व्यक्ती देशाला चॅम्पियन बनवून देईल, असं कोणालाच वाटलं नव्हतं.

नौदलात मिळाली नोकरी

शमशेर सिंग आणि चतारा सिंग हे जुगराज सिंग यांच्या आयडिल व्यक्तीमत्व होते. हे दोन्ही खेळाडू त्याच्या गावातील होते. या दोघांना पाहून त्यांना आयडिल मानून त्याने हॉकी खेळण्याचा निर्णय घेतला. जुगराजने जालंधर येथील हॉकी अॅकेडमी मध्ये प्रवेश घेतला आणि २०११ मध्ये PNB संघात निवड झाली. त्यांना फक्त ३५०० रुपये स्टायपेंड मिळत होता.

पण २०१६ मध्ये त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. जुगराला २०१६ मध्ये भारतीय नौदलाच्या संघात प्रवेश मिळाला आणि त्याला संघातील पॅटी अधिकारी बनवण्यात आले. जुगराजसाठी ही नोकरी मोलाची होती कारण त्याचा पगार ३५०० पासून ३५००० रुपयांपर्यंत पोहोचला होता. आज देशातील नागरिक जुगराजचं अभिनंदन करत आहे. जुगराजने आधी टीम इंडियाला ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळवून दिले. आता त्याने देशाला आशियाचा चॅम्पियन बनवलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com