Top 10 Headlines: शाळा 25 तारखेला बंद राहणार, आरोग्य कर्मचारी जाणार बेमुदत संपावर; वाचा टॉप १० हेडलाइन्स

Today's Top 10 Marathi News Headlines: महाराष्ट्रासह देशातील महत्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा
top 10 headlines
Top 10 Marathi News Headlinestop 10 headlines
Published On

अनंत चतुर्दशीसाठी पोलीस सज्ज -

अनंत चतुर्दशीदिनी होणाऱ्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी राज्यातील पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसह प्रत्येक शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस दलाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. अतिरिक्त फौजफाटा तैणात करण्यात आलाय. मुंबईमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल तैणात करण्यात आलेय.

मुंबई आणि पुण्यात वाजत-गाजत गणरायाला निरोप दिला जातो. जल्लोषात लोक या उत्साहात सहभागी होतात. लाडक्या बाप्पााला निरोप देण्यासाठी भक्तांचा महापूर रस्त्यावर येतो. त्यामुळे वाहतुकीतही बदल करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेवर विशेष गाड्या -

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईमध्ये रात्री उशीरापर्यंत बाहेर फिरणाऱ्या भाविकांसाच्या सोयीसाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून रात्री आठ विशेष गाड्या पश्चिम मार्गावर चालवण्यात येणार आहे. चर्चगेट-विरार यादरम्यान या गाड्या धावतील. मध्यरात्री ते पहाटे यादरम्यान या लोकल धावणार आहेत.

पुण्यातही रात्री मेट्रो वाहतूक सुरु राहणार आहे. पुण्यात गणपतीच्या दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील शाळा 25 तारखेला बंद राहणार

शिक्षक संचमान्यतेचा १५ मार्च २०२४ चा व कंत्राटी शिक्षक भरतीचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.

बुधवारपासून आरोग्य कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

आरोग्य कर्मचारी जाणार बेमुदत संपावर जाणार आहे. आरोग्य विभागाने मुंबईतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या ठाणे, पालघर, रायगड येथे केल्या आहेत. तर पुण्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या सातारा सोलापूर येथे करण्याचा शासन निर्णय काढल्याच्या विरोधात, कर्मचारी आंदोलन करणार आहे. या कर्मचाऱ्यांनी 18 सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

मुस्लिम मतदारांची नवीन नावे मतदार यादीत नको

कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर गावात मुस्लिम मतदारांची नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट करु नका, असा ठराव... ग्रामसभेत केला.

शिंगणापूर ग्रामसभेतील हा ठराव सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिंगणापूर ग्रामसभेचा ठराव व्हायरल झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात गोंधळ झाला. या प्रकाराबाबत शिंगणापूर सरपंचांची भलताच खुलासा केला. ते म्हणाले की, बांगलादेशीय अल्पसंख्यांक बाबत तो ठराव असल्याचे त्यांनी सांगितलं.

पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे आज लोकार्पण

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याला मिळालेल्या पहिल्या वंदे-भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने होणार असून पुणे-हुबळी या वंदे-भारत एक्स्प्रेसला केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे स्थानकावरुन झेंडा दाखवणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून पुणेकरांना प्रतिक्षित असणारी तसेच पुण्याहून सुटणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सातारा, मिरज, सांगली आणि कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोदी सरकारकडून महाराष्ट्राला ३ नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या असून यात पुणे-हुबळी, नागपूर-सिकंदराबाद आणि कोल्हापूर-पुणे आदी मार्गाचा समावेश आहे. या तिन्ही वंदे भारतचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

मोदी सरकारचा 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून विराजमान झाले आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिले १०० दिवस पूर्ण झाले आहेत. मोदी सरकार याच कार्यकाळात एकदा एक देश एक निवडणूक राबवण्यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातच देशात एक देश एक निवडणूक करण्याचा संकल्प करण्यात आलाय.

वेळ आणि पैशांची बचत यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. एक देश एक निवडणुकीला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. 2029 पासून देशभरात एक देश एक निवडणूक संकल्पना राबवली जाण्याची शक्यता आहे.

दिवाळीआधीच रेल्वे तिकिट वेटिंगवर -

दिवाळीच्या दीड महिना अधीच रेल्वेला तिकिट वेटिंग लागलेय. दसरा आणि दिवाळीला पुण्यातून राज्यासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक राज्यांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहेत. धावपळ नको म्हणून दोन ते तीन महिने आधीपासूनच प्रवाशांकडून रेल्वेचे बुकिंग करण्यात आलेय.

दिवाळीला गावी जाऊन सण साजरा करणार्‍यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या काळात एसटी, खासगी बसेस या फुल्ल असतात. प्रवासी रेल्वेचे तिकीट आगाऊ बुक करून ठेवतात. पुण्यातून जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गोरखपूर, दानापूर, झेलम, आझाद हिंद एक्स्प्रेस यांसह मराठवाड्यात जाणाऱ्या इतर प्रमुख गाड्यांना आताच वेटिंग सुरू आहे. पुण्यातून प्रामुख्याने पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, आंध्र प्रदेश या राज्यांत जाणार्‍या प्रवाशांची संख्या जास्त आहे. बिहार, पश्चिम बंगालमध्ये जाणार्‍या गाड्यांना बाराही महिने गर्दी असते.

६ गावांच्या हजारो हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न अखेर सुटला

साता-याच्या तासगाव उपसा सिंचन योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मान्यता अनेक वर्षांपासुन दुष्काळाच्या छायेत असलेल्या ६ गावांच्या हजारो हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न अखेर सुटला आहे.

कोरेगाव मतदासंघाला २ टि एम सी पाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. या झालेल्या निर्णयांनंतर उपसा सिंचन योजनांमधील महत्वाची उपसा सिंचन योजना समजली जाते त्या तासगाव उपसा सिंचन योजनेला मुख्यमंत्री यांनी GR काढून मान्यता दिली. वर्णे, देगाव , राजेवाडी, निगडी, कारंडवाडी, देवकरवाडी या गावांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला आहे. हजारो हेक्टर जमीनीचं क्षेत्र सिंचना खाली येणार आहे अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली.

महामार्गाचं लोकार्पण होण्यापूर्वीच कोसळल्या रस्त्याच्या कडा

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातुन गेलेला आहे. 2018 मध्ये या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीला सुरुवात झाली. मात्र, आता 6 वर्षांचा कालावधी लोटूनही याचं बांधकाम पूर्ण झालेलं नसून अतिशय संथगतीने सुरू आहे. ओव्हरलोड भरधाव वाहनं धावत असल्याने अपघाताची शक्यता.

तुमसर तालुक्यातील सालई आणि उसर्रा या गावादरम्यान या महामार्गावरील नाल्यावर पुलाची निर्मिती करण्यात आली. परंतु काही दिवसांपूर्वी आलेल्या अतिवृष्टीने पुलाच्या भागातील रस्त्याच्या कडा वाहून गेल्याने राष्ट्रीय महामार्ग धोकादायक झाला आहे. मात्र संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. तात्काळ या महामार्गाची दुरुस्ती करण्याची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com