Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: २० व्या वर्षी पतीचं निधन, SBI मध्ये झाडू मारला; टॉयलेट साफ केलं, त्याच बँकेत झाल्या अधिकारी

Success Story of Pratisksha Tonwalkar: १७ व्या वर्षी लग्न, २० व्या वर्षी नवऱ्याचे निधन झाले. कठीण परिस्थितीत त्यांनी रात्रीच्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पुढे स्टेट बँकेतच ते असिस्टंट जनरल मॅनेजर झाल्या आहेत.

Siddhi Hande

शिक्षणाला कोणत्याही वयाचे बंधन नसतो. प्रत्येक माणूस आयुष्यभर शिकत असतो. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आयुष्यात कधीही कोणाला कमी समजू नये. एखाद्या दिवशी तिच व्यक्त खूप मोठ्या पदावर आपल्याला भेटते. असंच काहीसं प्रतीक्षा तोंडवळकर यांच्यासोबत झालं. (Success Story)

प्रतीक्षा तोंडवलकर या सुरुवातीला स्टेट बँकेत सफाई कामगार म्हणून काम करायच्या. त्या शौचालय, फर्निचर साफ करायच्या. एकेकाळी सफाई कामगार म्हणून काम ते त्याच बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर असा प्रवाश प्रतीक्षा यांचा आहे.(Pratiksha Tondwalkar Success Story)

प्रतीक्षा यांनी १७ व्या वर्षी लग्न केले. त्या २०व्या वर्षी विधवा झाल्या.एकेकाळी ६० ते ६५ रुपये कमावणाऱ्या प्रतीक्षा आज खूप मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.

प्रतीक्षा यांनी १७ व्या वर्षीच त्यांचे लग्न झाले. त्यावेळी त्यांनी दहावीची परिक्षादेखील दिली नव्हती.त्यांचे पती स्टेट बँके बुकबाइंडर म्हणून काम करायचे. दुर्दैवाने प्रतीक्षा यांच्या पतीचे अपघातात निधन झाले. त्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला. (SBI AGM Pratiksha Tondwalkar success Story)

शिक्षण नसल्याने त्यांना नोकरी मिळत नव्हती. परंतु कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी त्यांनी स्टेट बँके सफाईचे काम केले. त्यांनी याच काळात रात्रीच्या कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १२वी पास केली. त्यानंतर त्यांनी पदवी प्राप्त केली.

प्रतीक्षा यांनी खूप कमी वयात संघर्ष केला.त्यांनी मानसशास्त्र विषयात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांना सफाई कामगारापासून ते बँक क्लर्क पदावर बढती मिळाली.

प्रतीक्षा यांनी १९९३मध्ये पुन्हा लग्न केले. त्यांचे पती प्रमोद यांनी त्यांना खूप साथ दिली. बँकिंग परीक्षा देण्यासाठीही प्रोत्साहन दिले. प्रतीक्षा यांनी आपल्या कामात खूप मेहनत घेतली. त्यांनी प्रशिक्षण/प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. त्यानंतर त्या CGM आणि त्यानंतर AGM पदावर पोहचल्या.त्यांनी त्यांची जिद्द आणि मेहनतीमुळे एवढं मोठं यश मिळवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT