Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडील मजुरी करायचे, आई भाजी विकायची, सोलापूरचा लेक IPS झाला, शरण कांबळेंचा खडतर प्रवास

Success Story of IPS Sharan Kamble: यूपीएससी परीक्षा पास करुन आयपीएस आणि आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न असते. शरण गोपीनाथ कांबळे यांनीदेखील आयपीएस होण्याचे स्वप्न पाहिले आणि पूर्ण केले.

Siddhi Hande

यूपीएससी ही सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी दिवसरात्र अभ्यास करावा लागतो. मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणताही व्यक्ती हे यश संपादन करु शकतो. आपलं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. असंच काहीसं शरण कांबळे यांनी केलं. महाराष्ट्राच्या लेकानं आपली परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

नेहमी मोठी स्वप्न पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी. अशीच मेहनत शरण गोपीनाथ कांबळे यांनी केलं. त्यांचीही परिस्थितीही फार चांगली नव्हती परंतु त्यांनी प्रयत्न केले आणि त्याचे त्यांना यश मिळाले.

शरण कांबळे हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूरचे रहिवासी. त्यांचा जन्म तळवले गावात झाला. त्यांचे वडील मजुरी करायचे तर आई भाजी विकायची. आई वडिलांनी खूप संघर्ष केला. परंतु शरणच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही.

शरण यांचे बालपण गरीबीत गेले. त्यांनी १०वीपर्यंतचे शिक्षण सरकारी शाळेत केले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण (Education) बाजूच्या गावातील शाळेत केले. यानंतर त्यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून सांगलीमधून बीटेक झाले. यानंतर IISc मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले.

यूपीएससी परीक्षेसाठी धुडकावली २० लाखांची ऑफर

शरण कांबळे यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून पीजी केले. त्यानंतर त्यांना २० लाखांच्या पगाराची नोकरी मिळाली होती. परंतु त्यांनी ही ऑफर धुडकावली. त्यांनी जॉब ऑफर नाकारली त्यानंतर दिल्ली येथे जाऊन यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.

शरण कांबळे यांनी दिल्ली येथे जाऊन यूपीएससी (IUPSC) परीक्षेची तयारी केली. त्यांनी या काळात महाराष्ट्र सरकारची स्कॉलरशिप स्कीम परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी आठ महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला १२००० रुपये स्कॉलरशिप मिळाली.

सलग तिनदा यूपीएससी परीक्षा

शरण कांबळे यांनी यूपीएससी सीएपीएफ परीक्षेत २०१९ मध्ये ऑल इंडिया रँक ८ मिळाली. त्यानंतर त्यांनी २०२० व्या वर्षी ऑल इंडिया रँक ५४२ रँक मिळवली. यानंतर ते आयपीएस अधिकारी बनले. यानंतर त्यांनी पुन्हा २०२१ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. १२७ वी रँक प्राप्त केली. यानंतर त्यांना आयएफएस कॅडर मिळाले. परंतु त्यांनी आयपीएस अधिकारी होण्याचे ठरवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT