11th Admission: अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभाग नापास, मेरिट लिस्ट पुढे ढकलल्या

11th Admission Merit List Timetable: अकरावीच्या अॅडमिशनची पहिली मेरिट लिस्ट गुरुवारी लागणार होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही यादी पुढे ढकलण्यात आली आहे.
FYJC 11th admission 2025
FYJC 11th admission Saam Tv News
Published On

संपूर्ण राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया यंदा ऑनलाइन राबविण्यात येतेय. मात्र 14 लाख विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात शिक्षण विभाग नेमका का नापास झाला? पाहूयात...

FYJC 11th admission 2025
11th Admission: अकरावीच्या प्रवेशाची पहिली यादी ३० जूनला, नवीन वेळापत्रक पाहा

अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग 'नापास', सॉफ्टवेअरमध्ये अडचण, विद्यार्थ्यांची कोंडी

संपूर्ण राज्यात मोठ्या दिमाखात इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवण्याची घोषणा करण्यात आली. पूर्वी केवळ पाच शहरांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाला ही प्रक्रिया राज्यासाठी राबवताना मात्र काही गणित जुळवता आलेल नाही. ऑनलाईन प्रवेशाचा हा 'भार' डोईजड झाल्यानं शिक्षण विभाग प्रवेशाच्या पहिल्याच परीक्षेत 'नापास' झालाय.

सॉफ्टवेअर बिघाडामुळे प्रवेशात अडचणी; 14 लाख विद्यार्थ्यी अजूनही प्रतीक्षेत

26 जूनला पहिली गुणवत्ता यादी (Merit List) प्रसिद्ध होणार असल्याने हजारो विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रांगा लावल्या पण यादी काही प्रसिद्ध झाली नाही.

सध्या शाखानिहाय आणि गुणांच्या टक्केवारीनुसार विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पण, जात संवर्ग आणि समांतर आरक्षणनिहाय साडेनऊ हजार महाविद्यालयांमधील कोणत्या शाखेचा कट ऑफ किती ? हे त्या संकेतस्थळावर दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांचा पालकांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय.

FYJC 11th admission 2025
11th Admission: या विद्यार्थ्यांना मिळणार नाही अकरावीत प्रवेश; बोर्डाने दिली महत्त्वाची अपडेट

सुधारित वेळापत्रक

विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रवेश यादी जाहीर : 30 जून

विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश नोंदणी: 1 ते 7 जुलै

दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा निश्चिती : 9 जुलै

दहावीचा निकाल लागून जवळपास दीड महिना लोटला तरी अकरावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर झालेली नाही. सॉफ्टवेअरमध्ये नेमकी काय अडचण आहे याचा शोध आयटीच्या टिमलाही लागलेला नाही. एकूणच अकरावीचे प्रवेश सुरळीतपणे व्हावेत यासाठी राबवली जाणारी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी आणि पालकांसाठी नस्ती डोकेदुखी ठरली आहे..

FYJC 11th admission 2025
11th Admission : ११वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत कामाची बातमी; शासनाने घेतला मोठा निर्णय, संस्थाचालक अन् विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com