FYJC Merit List : अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी आज जाहीर होणार, विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार?

FYJC Special Merit List: अकरावी प्रवेश प्रकियेची विशेष गुणवत्ता यादी आज जाहीर होणार होणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती येथील महापालिका क्षेत्रात ही यादी जाहीर केली जाणार आहे.
FYJC Merit List
FYJC Merit ListSaam Tv
Published On

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीचा गुणवत्ता यादी आज ५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. किंवा ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी ही गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

FYJC Merit List
Jayakwadi Dam Water : खुशखबर! जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत तब्बल 10 टक्क्यांनी वाढ; मराठवाड्याला मोठा दिलासा

मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी विशेष प्रवेश फेरीची पहिली यादी जाहीर होणार आहे. आज सकाळी ११ वाजता ही यादी जाहीर करण्यात येणार आहे. ३१ जुलैपर्यंत या फेरीसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत होती.

मुंबई, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अकरावीच्या जागा रिक्त आहे. याआधी झालेल्या तीन फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश नाकारले आहेत. त्यांना त्यांच्या पसंती क्रमानुसार प्रवेश मिळतील, अशी अपेक्षा आहे.

FYJC Merit List
Maharashtra Politics: 'माढ्या'वरून महाविकास आघाडीत वातावरण तापलं; शरद पवार गटाच्या जागेवर कॉंग्रेसचा दावा

या प्रवेश फेरीत आरक्षणाचे कोणतेही नियम लागू केले जात नाही. शालेय शिक्षण विभागाने मागील काही वर्षांपासून आरक्षणाचे नियमच धाब्यावर बसवून हे प्रवेश सुरू केले आहेत. मुख्य तीन प्रवेश फेरी संपल्यानंतर रिक्त जागांचा आढावा घेऊन राखीव गटातील आरक्षण निश्चित करुनच या विशेष फेरीचे आयोजन केले जाते. परंतु याकडे शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विशेष फेरीमध्ये आरक्षणाचा कोणताही भाग न ठेवता आल्याने विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागतो.

FYJC Merit List
Shravan 2024: आज पहिला श्रावणी सोमवार; भाविकांची मंदिरात तुफान गर्दी, दर्शनासाठी लांबच लांब रांगा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com