अभिजित देशमुख
Mumbai Goa Expressway : - गणेशोत्सव जवळ येताच पुन्हा मुंबई गोवा महामार्गावरून राजकारण तापू लागले आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी शनिवारी मुंबई गोवा महामार्गाचे काम खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी ताब्यात घ्यावे अशी मागणी करणारे पत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले. कदम यांनी पत्र देत भाजपाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांना डिवचल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेत उघड नाराजी व्यक्त केली. कदम यांनी अशा प्रकारे महायुतीत मिठाचा खडा टाकू नये, असे सुनावतानाच हिमंत असेल तर समोर येऊन बोला असे खुजल्या आणणारे राजकारण करत महायुतीतील वातावरण बिघडवू नका असे खडे बोल सुनावले. सुरुवात तुम्ही केलीत तर शेवट आम्ही करणार, आम्ही सोडणार नाही असा गंभीर इशारा दिला आहे. तर राजेश कदम यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देताना आपण चाकरमानी म्हणून आपल्या नेत्याकडे व्यथा मांडल्या. त्यांना जसे आपली मते मांडण्याचे स्वातंत्र्य आहे तसेच आम्हाला देखील आहे. आम्ही कोणाला दुखावण्यासाठी हे केलेले नसल्याचे सांगताना शशिकांत कांबळे यांनी गणेशोत्सव काळात या रस्त्यावरून प्रवास करावा म्हणजे त्यांना आमच्या व्यथा कळतील, अशा शब्दात सुनावले आहे.
दोन्ही पक्षातील नेते माघार घेण्यास तयार नसल्याने आता कल्याण पूर्वे नंतर डोंबिवलीत देखील शिवसेना – भाजपातील वाद उफाळून आल्याचे दिसत आहे.
केंद्र सरकारच्या निधीतून मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू असून अजूनही या महामार्गावरून कोकणवासीयांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. गणेशोत्सव जवळ येताच पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्ग चर्चेत आला आहे. डोंबिवली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकणवासी यांच्या सह्यानिशी एक पत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना देत या मुंबई महामार्गाचे काम हातात घेत लवकरात लवकर मार्ग पूर्ण करण्याची मागणी केली. एकीकडे कल्याण पूर्वेला गोळीबार प्रकरणानंतर शिवसेना भाजपातील वाद पेटलेला, असतानाच आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू होता. आता डोंबिवलीतही शिवसेना भाजपातील वाद संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
राजेश कदम यांनी मंत्री चव्हाण यांना डिवचल्यानंतर आक्रमक झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर कदम यांच्या विरोधात आगपाखड सुरु केली आहे. तर भाजपा नेते शशीकांत कांबळे यांनी कदम यांना फैलावर घेताना कदम यांना यासारख्या पोस्ट करताना आपण महायुतीतील घटक आहोत, हे समजायला हवे होते आम्हाला आमचे नेते कायमच महायुतीत कोणत्याही प्रकारे मिठाचा खडा पडेल. यासारखी वक्तव्य करू नका म्हणून समजवताता मात्र याचवेळी खासदार श्रीकांत शिंदे यांना खुश करण्यासाठी राजेश कदम अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करत असल्याचा आरोप केला. निवडणुका जवळ आल्यानेच राजेश कदम यासारखे वक्तव्य करत असून आम्ही लोकसभेत खासदार शिंदे यांना मदत केली असून महाराष्ट्रातील वातावरण विरोधात असतानाही महायुतीच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच खासदार शिंदे दोन लाखाच्या मताधिक्याने निवडून आल्याची आठवण देखील त्यांनी करून दिली. तर यापुढे इशारा देताना त्यांनी सुरुवात तुम्ही केली तर शेवट आम्ही करणार जर तुम्ही आमच्या नेत्यांबद्दल काही चुकीचे वक्तव्य करणार असलात तर आम्ही सोडणार नाही असेही सुनावले. तर शेवटी राजेश कदम विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांनी ते समोर येऊन आपल्या नेत्यांकडे मांडावे, खुजली आणणारे राजकारण करू नये असे खडसावले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.