Gadchiroli News : गरोदर महिलेला खाटेवर घेऊन उपचारासाठी तीन किलोमीटर पायपीट; गडचिरोली जिल्ह्यातील धक्कादायक चित्र

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते यांचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावे लागत आहे
Gadchiroli News
Gadchiroli NewsSaam tv
Published On

मंगेश भांडेकर 
गडचिरोली
: पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य समस्या किती बिकट असते; याचे भयान वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. रस्ते नसल्याने येथे नेहमीच समस्या असते. आरोग्य सेवा देखील पोहचू शकत नसल्याने रुग्णांना पायपीट करत यावे लागत असते. त्यानुसार गरोदर महिलेला उपचारासाठी नेण्यासाठी खाटेवर घेऊन तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे धक्कदायक चित्र जिल्ह्यात पुन्हा एकदा पाहण्यास मिळत आहे. 

Gadchiroli News
Akola Accident : अकोल्यात डिझेल टँकर पलटी; डिझेल भरण्यासाठी लोकांची गर्दी

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयापासून पासुन २० किलोमीटर अंतरावरील असलेल्या केरामीटोला येथील गरोदर महिला रोशनी शामसाय कमरो हिला खाटेवर उचलून तब्बल तीन किलोमीटर अंतर पार करत रुग्णालय गाठावे लागले. त्या महिलेला आधी चरविदंड येथे नेण्यात आले. मात्र रस्ता नसल्यामुळे पाण्याने भरलेला नाला पार करावा लागला. चरविदंड येथून एका खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय कोरची येथे तपासणी करून गडचिरोलीला रेफर करावे लागले. 

Gadchiroli News
Ujani Dam : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..उजनी धरणात ८७ टक्के पाणीसाठा, भीमा नदीत केला जाणार विसर्ग

आरोग्य, रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 

या प्रकारामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते यांचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावे लागत आहे. ग्रामीण भागात रस्त्या अभावी नागरिकांच्या जीवाशी खेळ चाललाय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गावपाड्यातील हि समस्या कधी दूर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com