Ujani Dam : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..उजनी धरणात ८७ टक्के पाणीसाठा, भीमा नदीत केला जाणार विसर्ग

Baramati news : पुणे, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यासाठी जीवनदायनी ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा ८७ टक्क्याहून अधिक झाला आहे.
Ujani Dam
Ujani DamSaam tv
Published On

बारामती : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सद्यस्थितीला धरण ८७.६८ टक्क्यापेक्षा अधिक भरले आहे. अवघ्या नऊ दिवसात उजनीत ४६ टीएमसी पाणी जमा झाले असून आता उजनीत एकूण ११० पूर्णांक ६३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. यामुळे आता पाण्याची चिंता मिटली आहे. 

Ujani Dam
Parola News : पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचा मृत्यू; पारोळा जवळील भोकरबारी धरणातील घटना

पुणे, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यासाठी जीवनदायनी ठरलेल्या उजनी धरणातील (Ujani Dam) पाणीसाठा ८७ टक्क्याहून अधिक झाला आहे. उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आज रविवारी दुपारी बारा वाजेच्या आकडेवारीनुसार उजनी धरण हे ८७.६८ टक्के भरलं असून उजनीत एकूण ११० पूर्णांक ६३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान सायंकाळी पाच वाजता उजनी धरणातून भीमा नदीत (Bhima River) पाणी सोडण्यात येणार आहे.

Ujani Dam
Akola Accident : अकोल्यात डिझेल टँकर पलटी; डिझेल भरण्यासाठी लोकांची गर्दी

उजनी धरणात मागील आठवड्यापर्यंत पाणी साठा हा मायणासमध्ये होता. २६ जुलै रोजी मायनस मधून प्लस मध्ये आले होते. अवघ्या नऊ दिवसात उजनीत ४६ टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला असून यंदाच्या पावसाळ्यात १ जुलैपासून आज अखेरपर्यंत उजनीत एकूण ६६ टीएमसी पाणी साठा जमा झाला. सध्या उजनीत दौंड बंधाऱ्यातून ८५ हजार १२८ क्युसेक इतका विसर्ग येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com