पारोळा (जळगाव) : पारोळा तालुक्यातील वंजारी शिवारात असलेल्या भोकरबारी धरणाजवळ असलेल्या पीर बाबांचे दर्शन घेण्यासाठी पाच मित्र गेले होते. दरम्यान दर्शन घेतल्यानंतर धरणातील पाण्यात उतरलेले तिन जणांचा बुडून मृत्यू झाला. तर दोघेजण सुदैवाने बचावले आहेत. सदरची घटना ३ जुलैला दुपारी चारच्या सुमारास घडली.
पारोळा शहरातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज (वय १६), इजाज रजा न्याज मोहम्मद (वय १४), आश्रम पीर मोहम्मद (वय ९), इब्राहिम शेख अमीर (वय १४, सर्व रा. बडा मोहल्ला, पारोळा) व आवेश रजा शेख मोहम्मद (वय १७, रा. मालेगाव जि. नाशिक) हे पाच जण आज शहरापासून जवळ असलेल्या भोकरबारी धरणाच्या काठावरील पीर बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर त्यातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज, इजाज रजा न्याज मोहम्मद व आवेश रजा शेख मोहम्मद हे तिघे धरणातील पाण्यात खेळण्यासाठी उतरले. विशेष म्हणजे पाचपैकी कोणालाही पोहता येत नव्हते.
केवळ खेळण्यासाठी उतरलेल्या तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले. त्यांच्यासोबत असलेले आश्रम पीर मोहम्मद, इब्राहिम शेख अमीर हे काठावर उभे असल्याचे आपल्या मित्रांना बुडताना पाहून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. यानंतर दोघांनी वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेत घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.