चिमठाणे (धुळे) : पुलावरून कार जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरून कार थेट नाल्यात पडली. यात एका जणाचा मृत्यू झाला. तर अन्य चार जण जखमी झाल्याची घटना शिंदखेडा - साक्री राज्य मार्गावरील आरावे (ता. शिंदखेडा) गाव शिवारात घडली. घटनेनंतर गावातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.
शुक्रवारी रात्री इंदवे येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे संस्था चालक किरण पदमोर, लिपीक सज्जन पदमोर (Dhule) त्यांचे मेहुणे तथा नंदुरबारचे महसूल मंडळ अधिकारी श्री. गर्दे व जितेंद्र सोनवणे हे कारने धुळ्याहून चिमठाणे मार्गे हट्टी (ता.साक्री) गावाकडे घरी परत जात होते. यावेळी त्यांची कार चिमठाणे गावाच्या पुढे आरावे गावशिवारातील पुलाजवळ आली. यावेळी कार चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून थेट (Accident) नाल्याच्या पाण्यात पडली.
कार नाल्यात पडल्याची माहिती गावात समजताच गावातील नागरिक मदतीसाठी धावले. मात्र या अपघातात लिपिक सजन पदभोर (रा.हट्टी) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जुन्या नाल्यावर सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामाचा अंदाज चालकास न आल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.