लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आज सकाळी पुणे येथून ते सोलापूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे विधानसभा निवडणुकीचं (Vidhan Sabha Election) रणशिंग मराठवाड्यातून फुंकणार आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी आपल्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पाठवले होते.
त्यानंतर राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता 224 जागांवर मनसे आपले उमेदवार उभे करणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी लवकरच ते स्वतः दौरा करणार असल्यासही सांगितलं होतं.
त्यानुसार राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे. मराठवाड्यातील सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमधील पक्षीय बलाबल चा राज ठाकरे स्वतः आढावा घेणार आहे.
या जिल्ह्यांमध्ये मनसेने जे निरीक्षक पाठवले होते, त्यांच्यासोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे स्वतंत्र बैठकही घेणार आहेत. येत्या 13 ऑगस्टपर्यंत राज ठाकरे यांचा हा मराठवाडा दौरा असणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा नेमका कसा असणार जाणून घेऊयात थोडक्यात...
4 ऑगस्टला राज ठाकरे सोलापूर येथे असतील. तर 5 ऑगस्टला ते धाराशिवच्या दिशेने रवाना होती.
6 ऑगस्टला राज ठाकरे लातूर जिल्ह्याचा दौरा करतील. तर 7 ऑगस्टला ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जातील.
8 ऑगस्टला राज ठाकरे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जातील. 9 ऑगस्ट ला ते परभणी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतली.
10 ऑगस्ट रोजी राज ठाकरे बीड जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतली. त्यानंतर 11 11 ऑगस्टला ते जालन्यात येतील.
दरम्यान, 12 आणि 13 ऑगस्टला राज ठाकरे संभाजीनगरला असतील. या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे हे पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेतील.
या संपूर्ण दौऱ्यात राज ठाकरे हे मनसेने नेमलेल्या निरीक्षकांनी ज्या मतदार संघाची चाचपणी केली आहे. त्या दृष्टीने चर्चा करतील. तसेच या बैठका आणि या दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधतील.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.