Nandurbar news : आदिवासी संघटना आक्रमक; सुरत- नागपूर महामार्गावर रास्ता रोको, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

Nandurbar News : आदिवासी समुदायाकडून २० हुन अधिक मागण्यांसाठी गेल्या २४ दिवसांपासून जिल्हाधिकार कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरु आहे.
Nandurbar news
Nandurbar newsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : आपल्या विविध मागण्यांसाठी मागील २४ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुनही याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे आज आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सुरत- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आपल्या मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

Nandurbar news
Sangli News : वाहून जाणारे पुराचे पाणी मिळण्याची मागणी; जतच्या संखमध्ये दुष्काळग्रस्तांचा रास्ता रोको

आदिवासी समुदायाकडून २० हुन अधिक मागण्यांसाठी गेल्या २४ दिवसांपासून जिल्हाधिकार कार्यालयाबाहेर (Nandurbar) धरणे आंदोलन सुरु आहे. पालकमंत्री अनिल पाटील यांनी देखील आंदोलकांची भेट घेवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र बहुतांश मागण्या या आदिवासी विकास विभागाशी निगडीत असल्याने याबाबत आदिवासी मंत्री अथवा संबंधीत विभागाच्या कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्यांनी याबाबत भेट देवून आश्वासन दिने नव्हते. यामुळे आदीवासी संघटनेच्या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेण्याच निर्णय घेतला आहे. यामुळेच आज रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन करण्यात आले. 

Nandurbar news
Bhandara Heavy Rain : आसगावला पाण्याचा वेढा; पवनी, लाखांदूर तालुक्याचा संपर्क तुटला

दिड तास रोखला महामार्ग 

आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी महामार्गावर रस्ता (Surat Nagpur Highway) अडवून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी तब्बल दिड तास रास्ता रोको करण्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. अखेर प्रशासनाने आंदोलनांका ताब्यात घेतल्यानंतर दोन तासांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरु झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com