कोल्हापूरनंतर सोलापूर मिशन! एकनाथ शिंदेंचा भाजपला मोठा धक्का, माजी महापौर शोभा बनशेट्टी शिंदेंच्या सेनेत

Solapur Shobha Banshetty Join Shiv Sena : शोभा बनशेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाने डावलल्यानंतर सोलापूर शहर उत्तरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती.
Solapur Shobha Banshetty Join Shiv Sena
Solapur Shobha Banshetty Join Shiv Sena Saam Tv News
Published On

विश्वभूषण लिमये, साम टिव्ही

सोलापूर : कोल्हापूरनंतर आता सोलापूर जिल्ह्यात देखील शिवसेना शिंदे गटामध्ये आणखी एक मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश झाला आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Shobha Banshetty Join Shiv Sena) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. शोभा बनशेट्टी या सोलापूर महापालिकेच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत.

शोभा बनशेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाने डावलल्यानंतर सोलापूर शहर उत्तरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. सोलापूर शहरात मागील अनेक वर्षांपासून बनशेट्टी कुटुंबाचे राजकीय वर्चस्व राहिलेलं आहे. शोभा बनशेट्टी या अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या कन्या आहेत. माझी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापूर शहरात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.

Solapur Shobha Banshetty Join Shiv Sena
Maharashtra Political News : महाराष्ट्राचं राजकारण तापलं; भाजपच्या दिग्गज नेत्याची थेट एकनाथ शिंदे यांना ठस्सन, VIDEO

२ माजी महापौरांसह २० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरवर लक्ष केंद्रीत केलं आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेनं अनेक मोठ्या नेत्यांना गळाला लावलंय. एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात एकाच वेळी काँग्रेसचे सतेज पाटील, भाजप आणि ताराराणी आघाडीला धक्का दिला. तीनही गटातील दोन माजी महापौर आणि २० नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.

एकनाथ शिंदेंनी आधी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे कट्टर समर्थन शारंगधर देशमुख यांना फोडलं. त्यानंतर आता महापालिकेच्या निवडणुकांआधी एकनाथ शिंदेंनी परत एकदा कोल्हापूरवर लक्ष केंद्रीत करत तेथील भाजप- काँग्रेस आणि ताराराणी आघाडीला धक्का दिला. येथील जवळपास २० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. काँग्रेसचे प्रमुख मोहरे फोडल्याने हा सतेज पाटील यांना धक्का मानला जात आहे.

Solapur Shobha Banshetty Join Shiv Sena
Crime News : अहिल्यानगर हादरलं! आठवीतल्या विद्यार्थ्याचा दहावीतल्या विद्यार्थ्यावर शाळेतच सपासप वार, जीवघेणा हल्ल्यात मुलाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com