Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: अवघ्या २२ व्या वर्षी केली UPSC क्रॅक; IAS स्वाती मीणा आहेत तरी कोण?

Success Story of IAS Swati Meena: स्वाती मीणा यांनी यूपीएससी परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. त्या २००७ च्या बॅचच्या सर्वात कमी वयात यूपीएससी क्रॅक करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी होत्या.

Siddhi Hande

मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होतो. यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्यासाठी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागले. खूप कमी विद्यार्थ्यांना यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात यश मिळते. परंतु देशातील असेही काही विद्यार्थी आहेत त्यांनी खूप कमी वयात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. स्वाती मीणा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. (Success Story Of IAS Swati Meena)

स्वाती मीणा यांना नेहमीच सरकारी विभागात काम करायचे होते. त्यांनी २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. २००७ च्या बॅचच्या त्या सर्वात लहान आयएएस ऑफिसर होतात. त्याचसोबत खूप कमी वयात आयएएस होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या.

स्वाती मीणा या मूळच्या अजमेरच्या रहिवासी आहेत. त्यांनी अजमेरमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांच्या आई डॉ सरोज मीना यांनी पीएचडी केली. त्या पेट्रोल पंप साभांळायच्या. स्वाती मीणा यांना घरातून खूप सपोर्ट मिळाला.

आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे, अशी स्वाती यांच्या आईची इच्छा होती. मात्र, त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्या आठवीत असताना त्यांच्या घरी नातेवाईक आले होते. त्यातील एकजण सरकारी अधिकारी होते. तेव्हापासून आपण सरकारी अधिकारी व्हावे, असं त्यांनी वाटलं. (IAS Swati Meena Success Story)

स्वाती मीणा यांनी तेव्हा आयएएस अधिकारी व्हायचे ठरवले. त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. या निर्णयाला त्यांच्या आईवडीलांचाही सपोर्ट मिळाला. त्यांनी खूप कमी वयात खूप चांगले यश मिळवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT