Success Story: कुटुंबात सात जण, महिन्याचे उत्पन्न फक्त ८००० रुपये; लेकीने जिद्दीने क्रॅक केली NEET; आता AIIMS मध्ये घेतलंय अ‍ॅडमिशन

Success Story Of Charul Honariya: चारुल होनारियाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. तिने नीट परीक्षेत खूप चांगले गुण मिळवले आज ती AIIMS दिल्ली येथे अॅडमिशन घेतले.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

आयुष्यात कितीही अपयश आले तरीही त्यावर मात करायचा असते. खडतर परिस्थितीवर मात करुन जो व्यक्ती आयुष्यात पुढे जातो तो नक्कीच यशस्वी होतो. असंच यश चारुल होनारिया होनारिया हिने मिळवलं आहे. तिने नीट या सर्वात अवघड परीक्षेत टॉप केले आहे.

नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेस टेस्ट म्हणजे नीट परीक्षेत त्यांनी यश मिळवलं आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची होती. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही तिने खूप अभ्यास करुन यश मिळवले आहे. (Success Story Of Neet Cracker)

Success Story
Farmer Success Story : सेंद्रिय गुळ उत्पादनात शेतकरी महिलेची भरारी; वर्षाकाठी घेताय १० लाखाचे उत्पन्न

चारुल होनारिया उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यातील करतापुर गावची रहिवासी आहे. ती शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आली. तिला जीवनावश्यक गोष्टींसाठीही संघर्ष करावा लागला. चारुलचे वडील मेहनत करुन शेती करायचे. त्याचसोबत इतरांच्या शेतात जाऊनदेखील मजुरी करायचे. मिडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या घरात सातजण राहायचे. एवढ्या लोकांचा उदरनिर्वाह करणे हे खूप कठीण होते. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे मासिक उत्पन्न हे ८००० रुपये होते.

चारुल होनारियाचे डॉक्टर व्हायचे स्वप्न होते. तिने खूप मेहनत घेऊन नीट परीक्षा क्रॅक केली. नीट ही सर्वात अवघड परीक्षांपैकी एक आहे.

चारुलचे इंग्रजी खूप कमजोर होते. त्यामुळे तिने आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यास सुरुवात केली. तिने १०वीत असतानाच नीट परीक्षेची तयारी केली.तिच्याकडे कोचिंगसाठीही पैसे नव्हते. त्यानंतर तिने स्कॉलरशिपसाठी अप्लाय केले. त्यानंतर तिने टॉप कोचिंग क्लासेसमध्ये अॅडमिशन घेतले.

Success Story
Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, मित्रांकडून उधार पैसे घेऊन घेतली पुस्तके, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक;IRS कुलदीप द्विवेदी यांचा प्रवास

दोन वर्ष मेहनत घेऊन चारुल होनारियाने १२वीत ९३ टक्के मिळवले. त्यानंतर तिने नीट परीक्षा क्रॅक केली. यानंतर देशातील सर्वात टॉप मेडिकल कॉलेज AIIMS दिल्ली येथे अॅडमिशन घेतले. चारुलला ७२० पैकी ६३१ गुण मिळाले होते. आता ती लवकरच डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करेल.

Success Story
Success Story : वडील मनरेगावर घर चालवायचे, ताडपत्रीच्या घरात राहिला, जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS पवन कुमार यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com