
आयुष्यात जी परिस्थिती असेल तिचा सामना करुन प्रत्येक व्यक्तीला पुढे जायचे असते. कितीही खडतर परिस्थिती असली तरीही त्यावर मात करुन आपल्याला यश मिळवायचे असते. यूपीएससी ही देशातील खूप अवघड परीक्षा आहे.
या परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु कितीही खडतर परिस्थिती असली तरीही त्यावर जो व्यक्ती मात करतो तो नक्कीच यशस्वी होतो. असंच काहीतरी लखनऊच्या कुलदीप द्विवेदी यांच्यासोबत झालं. कुलदीप यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (Success Story Of IRS Kuldeep Dwivedi)
कुलदीप हे मुळचे इलाहाबादचे रहिवासी. त्यांनी इलाहाबाद युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले. त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांनी खूप मेहनतीने यश मिळवले.
कुलदीप यांचे वडील गार्ड म्हणून नोकरी करायचे. परंतु या पैशातून त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण होत नव्हते. त्यामुळेच त्यांचे वडील नोकरीसोबतच शेतीदेखील करायचे. त्यातून त्यांना जे पैसे मिळायचे ते पैसे मुलासाठी इलाहाबाद येथे पाठवून द्यायचे.
कुलदीप यांनी २००९ साली ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.कुलदीप यांच्याकडे पुस्तके घेण्यासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी मित्रांकडून पैसे उधार घेऊन पुस्तके विकत घेतली. त्यांनी कोणत्याही मोबाईल किंवा लॅपटॉपशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.
कुलदीप द्विवेदी यांनी २०१५ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्लिअर केली. त्यांनी २४२ रँक मिळवली. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. कुलदीप यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी खूप मेहनतीने हे यश मिळवले आहे. (UPSC Success Story)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.