
यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससीच्या परिक्षेपेक्षाही आयुष्याची परीक्षा खूप अवघड असते, असं म्हणतात. अशी परीक्षा मनीषा आव्हाळे यांचीही झाली. परंतु त्यांनी यूपीएससीसोबत आयुष्याच्या परीक्षेतही रँक मिळवला आहे. मनीषा यांनी यूपीएससी परीक्षेत चांगलेच यश मिळवले आहे. उल्हासनगरच्या इतिहासात प्रथमच महिला आयुक्त झाल्या आहे. मनीषा आव्हाळे यांची मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. (IAS Manisha Awhale Success Story)
मनीषा यांचे आईवडील दोघेही आजारी होते. त्यांचा प्रिलियम्सचा निकाल लागला तेव्हा त्यांना कळाले की, आपल्या वडिलांनी काहीतरी गंभीर आजार झाला आहे. त्याचदरम्यान त्यांना कळाले की, आपल्या आईलाही ब्रेस्ट कॅन्सर आहे. या कठीण परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक करुन आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
मनीषा या मूळच्या धुळ्याच्या रहिवासी. त्यांनी चौथीनंतरचे शिक्षण पुण्यात बोर्डिंग शाळेत घेतले. त्यांनी एलएलबी पदवी प्राप्त केली. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी वडिलांनी त्यांनी दिल्लीला पाठवले. (UPSC Success Story)
मनीषा यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ८३३ रँक मिळवली. त्यांचे वडील खूप आजारी होते. त्यांना उपचारासाठी पुण्यात आणले होते. ते दोन महिने आयसीयूमध्ये होते. या काळातच त्यांच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागला परंतु तेव्हा त्यांनी ८ दिवसांनी हा निकाल बघितला. मुख्य परीक्षेचा फक्त एक महिना अभ्यास त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्या आईला कॅन्सर झाल्याचेही त्यांना समजले. त्यामुळे त्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी यूपीएससीसह आयुष्याच्या परीक्षेतही यश मिळवले.
परीक्षेच्या तयारीदरम्यान त्यांना नेहमी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागायचे. परंतु त्यांनी या परिस्थितीतही मुलाखतीची तयारी केली. त्यांनी पहिल्या प्रयत्नात यश मिळवले. त्यांचे इंडियन रेल्वे अकाउंट सर्विसमध्ये सिलेक्शन झाले.
मनीषा यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. त्यांनी दुसऱ्यांदा पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी ३३ वी रँक मिळवली. त्यांनी आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले. कितीही खडतर परिस्थिती असली तरी त्यावर मात कशी करायची हे मनीषा आव्हाळे यांनी दाखवून दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.