पुन्हा-पुन्हा तीच भीतीदायक स्वप्न का पडतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Surabhi Jayashree Jagdish

स्वप्न

जेव्हा एखादी व्यक्ती तेच स्वप्न पुन्हा पुन्हा पाहते तेव्हा असं का घडतंय याचा विचार त्याला अस्वस्थ करतो. यामागे काय वैज्ञानिक कारण आहे ते पाहूयात

सबकॉन्शियस माइंड

सबकॉन्शियस माइंड हा मानवी मेंदूचा एक भाग असून तो आपल्या सर्व विचार, भावना, सवयी आणि आठवणींचं भांडार आहे. हे आपल्या जागरूक मनापासून वेगळे कार्य करतं.

परिणाम

याचा आपल्या विचार, वागणूक आणि निर्णय प्रक्रियेवर खोलवर परिणाम होतो. जरी आपल्याला ते जाणवत नाही.

यामागील विज्ञान

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात काही समस्या किंवा चिंतेशी झुंजत असते तेव्हा त्याचे मन स्वप्नांच्या माध्यमातून व्यक्त होतं. समस्येचे निराकरण होईपर्यंत हे स्वप्न पुन्हा पुन्हा येऊ शकते.

सबकॉन्शियस माइंडचं प्रतिबिंब

स्वप्नं ही आपल्या सबकॉन्शियस माइंडचं प्रतिबिंब असतात. वारंवार स्वप्न पडण्यामागील कारण काही जुना अनुभव, भीती किंवा भावनिक गोष्टी असू शकतात.

मेंदू आणि स्मृती

मेंदू झोपेच्या दरम्यान आठवणींचं आयोजन आणि पुनर्रचना करतो. जर एखादी घटना किंवा अनुभव मेंदूवर खूप प्रभावी असेल तर तो स्वप्नात वारंवार दिसू शकतो.

फोबिया

कोणत्याही भीती किंवा फोबियाशी संबंधित स्वप्नं पुन्हा पुन्हा येऊ शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल, तर तुम्हाला उंचावरून पडण्याची वारंवार स्वप्ने पडत असतील.

PTSD

पीटीएसडीने ग्रस्त असलेल्या लोकांना वाईट घटना किंवा भावनिक आघातानंतर वारंवार तेच स्वप्न पडण्याची शक्यता असते.

झोपेचे टप्पे आणि REM

स्वप्नं सहसा REM (रॅपिड आय मूव्हमेंट) झोपेच्या दरम्यान येत असतात. जर मेंदू एखाद्या अनुभवाशी किंवा विचाराशी सखोलपणे जोडलेला असेल तर तो REM अवस्थेत पुन्हा पुन्हा येऊ शकतो.

कधी होणार जगाचा विनाश? बाबा वेगांची सर्वात धोकादायक भविष्यवाणी

baba venga | saam tv
येथे क्लिक करा