Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची कमाल, अवघ्या २४ व्या वर्षी दोनदा क्रॅक केली UPSC; IAS ईश्वर्या रामनाथन यांची यशोगाथा वाचा

Success Story of IAS Ishwarya Ramnathan: यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. ईश्वर्या रामनाथन यांनी २४ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

Siddhi Hande

अनेकदा आपण आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहून खूप काही शिकतो. त्यातून जिद्दीने काहीतरी करण्याचा निर्णय घेतो. जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकतो. असंच ईश्वर्या रामनाथन यांनी मिळवलं आहे. (Success Story Of IAS Ishwarya Ramnathan)

ईश्वर्या रामनाथन यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. वडील शेतकरी आणि आई सरकारी अधिकारी होती. ईश्वर्या या मुळच्या तटीय जिल्हा कोड्डालोर येथील रहिवासी. तिथे अनेकदा महापूर, चक्रिवाडळ आणि मुसळधार पावसाने सावट होते. त्यामुळे अनेकदा खूप अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. २००४ साली आलेल्या त्सुनामीने त्यांचे आयुष्यच बदलले. या काळात त्यांनी कलेक्टर गगनदीप सिंह बेदी यांना काम करताना पाहिले. त्यामुळे त्या खूप प्रभावित झाल्या. त्यानंतर त्यांनी यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. (Young IAS Officer Ishwarya Ramnathan)

ईश्वर्या यांच्या आईचे लग्न खूप लहान वयात झाले. त्या काळात त्यांच्या आईला सरकारी नोकरी मिळाली. त्यांच्या मुलीने कलेक्टर होऊन नाव मोठे करावे, अशी त्यांची खूप इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी नेहमी त्यांना प्रेरित केले. (Success Story )

ईश्वर्या या सर्वात तरुण आयएएस (young ias officer) ऑफिसरपैकी एक आहेत. त्यांनी २०१७ साली इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी कॉलेजच्या काळात यूपीएससी परिक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी कोचिंग क्लासेसदेखील लावले होते. पहिल्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी क्लिअर केली.तेव्हा त्यांना रेल्वेत अकाउंट्स सर्व्हिसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. परंतु त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी २०२९ साली पुन्हा दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. तेव्हा त्यांना ४७ वी रँक मिळवली. २४ व्या वर्षी त्या आयएएस अधिकारी बनल्या.

परिस्थिती माणसाला सर्वकाही शिकवते आणि त्यावर मात करुन काहीतरी करुन दाखवण्याची जिद्ददेखील देते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आयएएस ईश्वर्या आहे. त्यांनी खूप लहान वयात खूप मोठं यश मिळवलं आहे. त्यांनी आपल्या आईवडिलांचे नाव मोठे केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

SCROLL FOR NEXT