Success Story Saam tv
बिझनेस

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Success Story of IFS Shreyak Garg: श्रेयस गर्ग यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी सुरुवातीला डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले त्यानंतर यूपीएससी परीक्षा दिली.

Siddhi Hande

MBBS केले अन् नंतर UPSC दिली

तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश

श्रेयक गर्ग यांचा प्रेरणादायी प्रावस

आयुष्यात अनेकदा परिस्थिती किंवा काही इतर कारणांमुळे आपल्याला आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. परंतु मनात कुठेतरी कायमच स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नसते. तुम्ही कधीही आपले स्वप्न पूर्ण करु शकतात. यूपीएससी परीक्षा देण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्रेयस गर्ग यांनी वैद्यकीय फील्ड सोडली आणि यूपीएससीची तयारी केली.

डॉक्टर ते UPSC (Doctor to UPSC Journey)

श्रेयस गर्ग यांनी स्पर्धा परीक्षा पास केली. त्यांनी यूपीएससी परीक्षेत ३५ रँक प्राप्त केली. परंतु त्यांची आयएएस पदावर निवड झाली नाही. त्यांना IFS पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

महाराष्ट्रातून केले एमबीबीएस

श्रेयक यांनी एकदा सांगितले होते की, ते हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांचे वडील दीनबंधु छोटू राम सायन्स अँड टेक्नोलॉजी युनिव्हर्सिटी मुरथल येथे प्रोफेसर आहेत. सुरुवातीला श्रेयक यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था महाराष्ट्र येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले.

डॉक्टर झाल्यानंतर ते इंटर्नशिप करण्यासाठी ग्रामीण भागात गेले. याचवेळी ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या त्यांना समजल्या. त्यामुळेच त्यांनी बदल घडवून आणण्यासाठी प्रशासकीय सेवेत काम करण्याचा निर्णय घेतला.

दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात टॉपर

श्रेयक यांनी डॉक्टरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा पीरीक्षा दिली. तेव्हा त्यांना अपयश मिळाले. दुसऱ्या प्रयत्नात प्रीलियम्स पास केली परंतु मेन्स परीक्षेत अपयश आले.त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी परीक्षा पास केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding Shopping : आली लगीन सराई....लग्नासाठी शॉपिंग करताय? मग मुंबईतील या प्रसिध्द ठिकाणी नक्कीच जा

Historical Places In Maharashtra : अहिल्यानगरमधील 'या' किल्ल्यावर झाली इतिहासातील महत्त्वाची लढाई, लहान मुलांसोबत नक्की जा

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

SBI ATM Charges: स्टेट बँकेचा ग्राहकांना झटका! ATM मधून पैसे काढणे आता महागलं; वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मतदानाच्या आदल्या दिवशी मिळणार ३००० रुपये, काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य

SCROLL FOR NEXT