Mumbai-Pune Expressway
Mumbai-Pune ExpresswaySaam Tv

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी कायमची फुटणार; राज्य सरकारचा मास्टर प्लान

Mumbai-Pune Expressway Master Plan For Traffic: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी आता फुटणार आहे. या मार्गावरची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एसओपी आणखी कडक करणार आहेत.
Published on
Summary

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची वाहतूक कोंडी फुटणार

सरकारचा नवीन प्लान

एसओपी आणखी कडक करणार

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर नेहमीच वाहतूक कोंडी असते. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीला आळा बसवण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्यंतरी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या गॅस टँकर अपघातामुळे वाहतूक जवळपास ३६ तास ठप्प होती. त्यामुळे प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागला. एकाच जागेवर ३० तास अडकून राहावे लागले. दरम्यान, आता यावर सरकारने तोडगा काढला आहे. सरकारने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि आप्तकालीन सेवा सुधारण्यासाठी महत्त्वाचा आराखडा जाहीर केली आहे.

Mumbai-Pune Expressway
Vande Bharat Sleeper Train : आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार, कोणता असेल मार्ग, वाचा सविस्तर

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बोगद्याजवळ प्रोपीलीन वायू नेणारा टँकर उलटला होता. यानंतर विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. गॅस गळतीमुळे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आणि आप्तकालीन सुविधादेखील कमी पडल्या.

देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारची दुर्घटना पहिल्यांदाच ठरली. अशा धोकादायक वस्तू नेणाऱ्या कंपन्या या तयार नव्हत्या. तसेच एसओपीचे पालन करण्यासाठी तयार नव्हत्याचेही त्यांनी म्हटलं आहे. हा पूर्णपणे केस स्टडी होता. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती उद्भवली तर ते हाताळण्यासाठी एसओपी तयार करत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.

आपत्कालीन परिस्थितीत एजन्सीमध्ये चांगले समन्वय साधवण्यासाठी नवीन एसओपी विकसित केले जात आहे, असं फडणवीसांनी सांगितले. ज्वलनशील किंवा घातक पदार्थांच्या वाहतूकीसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करेल. दरम्यान, जर कोणी गंभीर जखमी झाले तर त्यांना रुबी क्लिनिक आणि अपोलो रुग्णालयात दाखल करण्यासाठी एका तासात गोल्डन अवरमध्ये एअर अॅम्ब्युलन्सचा वापर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यान, हेलिकॉप्टरसाठी रात्रीच्या वेळी सुविधा उपलब्ध नसल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले. आप्तकालीन परिस्थितीत यंत्रणा मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम व्यवस्था केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे.

Mumbai-Pune Expressway
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडी सोडवण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन,प्रवाशांचा वाचणार वेळ आणि पैसा

भविष्यात गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाची पाऊले

वेग आणि ओव्हरटेकिंगवर लक्ष ठेवण्यासाठी एक्सप्रेसवर हाय टेक कॅमेरे बसवण्यात आले आहे. याचं नियंत्रण कक्षाला रिअल टाइम फीड पाठवण्यात येईल. तसेच ब्लॅक स्पॉट्सवर चोवीस तास गस्त वाढवण्यात येईल. याचसोबत गर्दीचे मॅनेजमेंट करण्यासाठी फास्टॅग अनिवार्यकेले आहे. सुट्टीच्या काळात अतिरिक्त कर्मचारी कर्मचारी तैनात केले जातील.

Mumbai-Pune Expressway
Mumbai Police Recruitment : मुंबईमध्ये पोलीस भरतीत गैरप्रकार, धावण्याच्या स्पर्धेत केली अदलाबदल, चौघांविरोधात गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com