Success Story: परदेशातील ६० लाखांची नोकरी सोडली; पती-पत्नीनं भारतात सुरू केला स्टार्टअप; आज महिन्याला कमावतात लाखो रुपये

Success Story of The Pickls Founder: द पिकल्स या ब्रँडचे मालक सुदर्शन एम.के आणि प्रवलिका वी यांचा प्रवास खूप वेगळा आहे. त्यांनी ६० लाखांच्या पगाराची नोकरी सोडून स्वतः चा स्टार्टअप सुरु केला.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary

सुदर्शन एम.के आणि प्रवलिका वी यांचा प्रेरणादायी प्रवास

६० लाखांच्या पगाराची नोकरी सोडली अन् स्टार्टअप सुरु केला

आज कॅनडा, अमेरिकासह अनेक देशांमध्ये बिझनेसचा विस्तार

इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात. जिथे इच्छा असते तिथे आपोआप मार्ग निघतो. त्यामुळे जर तुमची स्वप्न पूर्ण करायची इच्छा असेल तर नक्कीच यश मिळते. असंच काहीसं सुदर्शन एम.के आणि प्रलिका वी यांनी केली. त्यंनी लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडली अन् स्वतः चा स्टार्टअप सुरु केला. त्यांना या व्यवसायात खूप यश मिळाले.

Success Story
Success Story : वडिलांचं छत्र हरपलं, मजुरी करणाऱ्या आईचं पाठबळ; आता घेतलीय वैश्विक भरारी, गोल्डन गर्ल श्वेताची प्रेरणादायी झेप

६० लाखांची नोकरी सोडली अन् स्टार्टअप सुरु केले

बंगळुरुचे रहिवासी सुदर्शन एम.के आणि प्रवलिका वी यांनी द पिकल्स नावाचा व्यवसाय सुरु केला. ते सुरुवातीला आयटी सेक्टरमध्ये काम करायचे. त्यांना ६० लाखांचे पॅकेज होते. परंतु त्यांच्या मनात स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी पत्नीसोबत द पिकल्स नावाचा D2C म्हणजे डायरेक्ट टू कंज्युमर नावाचा व्यवसाय सुरु केला.

द पिकल्स ब्रँड आंध्र प्रदेशमधील पारंपारिक लोणचे हे देशभरातली लोकांपर्यंत पोहचवत आहेत. त्यांनी सुफरफुड्स आणि मिलेट्सदेखील विकण्यास सुरुवात केली. उत्तम आरोग्यासाठी त्यांच्या ब्रँडचे प्रोडक्ट्स चांगले आहेत.

सुदर्शन एम. के आणि प्रवलिका वी यांचे चांगले शिक्षण झाले होते. त्यांनी इंजिनियरिंग आणि एमबीए केले होते. ते दोघेही आयटी प्रोफेशनल होते. त्यांना युएईमध्ये ६० लाखांच्या पॅकेजची नोकरी होती. दरम्यान, त्यांना काही कारणांनी भारतात परत यावे लागले. त्यानंतर दोघांनी भारतात आयटी कंसल्टिंग फर्म सुरु केली. परंतु त्यांना अजून काहीतरी वेगळे करायचे होते.

Success Story
Success Story: भावाच्या पावलावर पाऊल! मोठा भाऊ IAS, लहान भावानेही क्रॅक केली UPSC; उत्कर्ष यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

या दोघांनी मिळून डिसेंबर २०२३ मध्ये 'The Pickls' नावाचा व्यवसाय सुरु केला. त्यांचे प्रोडक्ट्स भारत, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा या देशांमध्ये विकले जातात. ते आता महिन्याला लाखो रुपये कमावतात.

Success Story
Success Story: चालताना अडचणी, नीट बोलता येत नव्हते, दिव्यांग असूनही क्रॅक केली UPSC; IRS मानवेंद्र सिंह यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com