Sangli News: पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, 35 प्रवासी जखमी

Sangli Bus Accident News: पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सांगलीजवळ मोठा अपघात घडला आहे, जिथे एसटी बस पुलावरून खाली कोसळल्याने 35 प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र, सांगलीजवळील तांदूळवाडी भागात हा अपघात घडला.
Accident
Accident google
Published On

सांगलीच्या पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला असून एसटी बस पुलावरून खाली कोसळल्याने 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही एसटी बस साताऱ्यातील दहिवडी आगाराची असून कोल्हापूरच्या जोतिबा डोंगराला जात होती. मात्र, सांगलीजवळील तांदूळवाडी भागात हा अपघात घडला.

बस महामार्गावर असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, त्यामुळे बसने पुलाचा कठडा तोडून थेट ओढ्यावर कोसळले. या भीषण घटनेत 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात आणि इस्लामपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Accident
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना अरेरावी, कुणाल बाकलीवालला अटक

या अपघातामुळे मोठी जीवितहानी होऊ शकली असती, परंतु प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. एसटी बस पुलावरून कोसळल्यानंतरही सर्व प्रवासी वाचल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी बचावकार्यात मोठा सहभाग घेतला.

Accident
Pune Crime: दारू पिण्यास पैसे न दिल्याने आई आणि भावावर कोयत्याने हल्ला, पुण्यात खळबळजनक घटना

अपघाताचे कारण चालकाचा ताबा सुटणे असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने प्रवासी वाहतुकीतील सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या अपघाताची चौकशी सुरू केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

Accident
Maharashtra Politics: भंडाऱ्यात भाजपला जोरदार धक्का, काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com