SBI Internship: शिक्षण पूर्ण झालंय? स्टेट बँकेत इंटर्नशिप करण्याची संधी; स्टायपेंड १६००० रुपये; अर्ज कसा करावा?

SBI Fellowship Programme: स्टेट बँक फेलोशिप प्रोग्रामअंतर्गत तरुणांना इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये तरुणांना स्टायपेंडदेखील मिळणार आहे.
SBI SIP Calculation
SBI SIP CalculationSaam Tv
Published On

शिक्षण पूर्ण झालंय किंवा या वर्षी ग्रॅज्युएट होणार आहात का? तर ही बातमी खास तुमच्यासाठी. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये इंटर्नशिपसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एसबीआय यूथ फॉर इंडिया फेलोशिप प्रोग्राम २०२५-२६ मघ्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

SBI SIP Calculation
Job Openings Meta : तरुणांसाठी खुशखबर! जगातील नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची संधी; शैक्षणिक पात्रता अन् पद कोणकोणती?

जर तु्म्हाला करिअरची सुरुवात करायची असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. स्टेट बँकेच्या पेड इंटर्नशिप योजनेसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करु शकतात. यासाठी youthforindia.org वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. ही इंटर्नशिप १३ महिन्यांची असणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांनी स्टायपेंड मिळणार आहे

एसबीआय यूथ फॉर फेलोशिपमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कामाचा अनुभव मिळणार आहे.एसबीआय फाउंडेशनतर्फे युवकांना ग्रामीण भारतात काम करण्याची संथी मिळणार आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात काम करता येणार आहे.

एसबीआय फेलोशिप प्रोग्रामसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे १ ऑक्टोबर २०२५ पूर्वी बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. यासाठी भारतीय नागरिक अर्ज करु शकतात. उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ३२ वर्षे असावी.

SBI SIP Calculation
Mahatransco Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महाट्रान्स्कोमध्ये भरती, २६० रिक्त जागा; अर्ज कसा करावा?

या कालावधीत उमेदवारांना स्टायपेंड मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहे. इंटर्नशिप झाल्यावर एसबीआय फाउंडेशनकडून कार्यक्रम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

या इंटर्नशिपसाठी तुम्हाला youthforindia.org या वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात. त्यानंतर अर्ज करा. यानंतर रजिस्ट्रेशन करा. यानंतर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

SBI SIP Calculation
Metro Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मेट्रोत भरती सुरु, पगार २.८० लाख, पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com