Ashlesha Nakshatra: आश्लेषा नक्षत्राचे लोक कसे असतात? स्वभाव, करिअर आणि आरोग्यावर प्रभाव

Personality Traits: बुध ग्रहाच्या अमलाखाली येणारे हे नक्षत्र. गंडांत नक्षत्र आहे. या नक्षत्राच्या व्यक्ती मध्यम उंची, आडवा बांधा, काहीसे बेढबतेकडे झुकणारे असतात.
Personality of Ashlesha Nakshatra
Ashlesha Nakshatra Traitsgoogle
Published On

आश्लेषा नक्षत्र

बुध ग्रहाच्या अमलाखाली येणारे हे नक्षत्र. गंडांत नक्षत्र आहे. या नक्षत्राच्या व्यक्ती मध्यम उंची, आडवा बांधा, काहीसे बेढबतेकडे झुकणारे असतात. स्त्रियांच्या बाबतीत सौंदर्याचे थोडे कमीच माप असते. कामसू वृत्ती नसते. खावे - प्यावे आराम करावा. संगीत ऐकणे, गाणी, टीव्ही यामध्ये रममाण होतात. स्वतःचे असे ठाम मत नाही.

Personality of Ashlesha Nakshatra
Shilpa Thakre: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यांत

महत्त्वाकांक्षा आणि ध्येय बेताचेच असते. पण घर आणि कुटुंबाबद्दल ओढ असते. कला कौशल्य आत्मसात करण्याची वृत्ती कमी. संगीत शिकण्यापेक्षा ऐकणे पसंत करतील. कलावंत असण्यापेक्षा कलाप्रियता आवडते. स्वभावाने प्रेमळ, उदार कुटुंब वत्सल पण काहीसे सुस्त आसतात. वेळ घालवायला आवडतो.

वेळ पडल्यास सुस्तपणा सोडून चपळाईने पराक्रमाने कामाचा फडशा पाडून टाकतात. सापा सारखे सर्व शांत ढिंम्म् सुस्त दिसत असला तरी वेळेला सळसळ याची अचंबित करून टाकणारी असते. या व्यक्तीचे गुणधर्म संमिश्र असतात. सुस्त शांत निद्रिस्त दिसतील पण वेळेला जागृत राहून प्रचंड कार्य करून आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवतील.

नोकरी व्यवसाय-

भाषातज्ञ, भाषेवर प्रभुत्व असते. लेखक, कवी, टीकाकार, सेल्समन, शाई चुना विक्रेते, लेखापरीक्षक, पेपर विक्रेते, जलसंपत्ती विभागात काम, गणितज्ञ, स्टेशनरी विक्रेते, रस्त्यावरील ज्योतिषी, नर्स कारकून, गावातील बँक, खेडेगावी असणारे अधिकारी, नाटक, सिनेमा करमणूक आणि चैनीच्या ठिकाणी काम करणारे वर्ग, राजदूत, गाईड इत्यादी.

रोग आजार -

वारंवार सर्दी पडसे होऊ शकते. तसेच वातूळ वातकारक प्रकृती असल्याने अपचन, पोटात गॅसेस धरणे, मळमळ होणे, त्वचेचे विकार, स्वच्छता न ठेवल्यास गजकर्ण, एक्झिमा, त्वचारोग संभवतात. या नक्षत्राच्या व्यक्तींना कुत्रा पाळणे आवडते. पण कुत्रा चावून त्रास होऊ शकतो.

Personality of Ashlesha Nakshatra
Ardra Nakshatra: आर्द्रा नक्षत्र असलेल्यांचा स्वभाव असतो जगावेगळा; आवड तर भलतीच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com