Ardra Nakshatra: आर्द्रा नक्षत्र असलेल्यांचा स्वभाव असतो जगावेगळा; आवड तर भलतीच

Ardra Nakshatra Rashi: राहूच्या अंमलाखाली येणारे हे सहावे नक्षत्र आहे. तीक्ष्ण असल्याने या व्यक्ती वृत्तीने अतिशय कठोर, हट्टी, दुराग्रही, काहीशा कृतघ्न, खोटी कामे करण्यात मागेपुढे बघत नाहीत.
Ardra Nakshatra
Ardra Nakshatra Rashisocial media
Published On

आर्द्रा नक्षत्र

कारकत्व -

राहूच्या अंमलाखाली येणारे हे सहावे नक्षत्र आहे. तीक्ष्ण असल्याने या व्यक्ती वृत्तीने अतिशय कठोर, हट्टी, दुराग्रही, काहीशा कृतघ्न, खोटी कामे करण्यात मागेपुढे बघत नाहीत. वेळेला विश्वासघात करतात पण आपले काम साध्य करून पुढे जातात. त्यासाठी बोलणं मिठ्ठास ठेवणार. मादक पदार्थ सेवनाची आवड असते. व्याभिचारी, नमकहराम गुप्त विद्याची आवड असते, फोटोग्राफी, फाइन आर्ट, फॅशन आवडते. वासनासक्त असतात.

तारुण्यात नको त्या गोष्टींचे आकर्षण आणि वाईट सवयी लागू शकतात. परजातीय विवाह होतो. आदिवासी लोकांची संबंध येतो. जंगलात करण्याची आवड, कुत्रे , मांजरी पाळण्याची आवड असते.सापाचे विष काढणे, जुगार, घोडे पाळणे या गोष्टींची आवड असते. बुद्धीने अत्यंत तल्लख, स्मरणशक्ती चांगली, कुठल्याही गोष्टीचे आकलन चांगले, संशोधनाची आवड, तंत्रशास्त्र तसेच यांत्रिक कामात पारंगत असतात.

Ardra Nakshatra
Chaturgrahi Yog: ५० वर्षांनी बनणार दुर्मिळ चतुर्ग्रही योग! 'या' राशींवर शनी-बुधासह ४ ग्रहांची विशेष कृपा

मॉडेलिंग, करतात. शरीर बांधा बऱ्यापैकी उंच. हात पाय लांब, मजबूत हाडेपेरे असतात. अंगावर मांस कमी दिसेल, पण कडकपणा चांगला असतो. रोगप्रतिकारशक्ती उत्तम, साहसी, धाडसी, स्वतंत्र वृत्ती, अधिकारालालासा यासाठी कोणाचीही पर्वा करत नाहीत. स्त्रिया सुद्धा अशाच स्वभावाच्या असतात. यांच्या वृत्तीला वाव न मिळाल्यास भांडखोर स्वभाव, तोंडाळ, वाचाळ, मत्सरी, उणे दुणे दोन्ही काढणार. टोमणे मारून हैराण करणाऱ्या असतात. पण एखादी स्त्री व्यसनी आणि नाठाळ पतीला मात्र तळ्यावर निश्चित आणू शकेल. हवे ते मिळवण्यासाठी साम-दाम-दंड-भेद सर्वांचा वापर करून ही गोष्ट मिळवतात. या यांच्यासाठी गोष्टी सहज असतात. कारण राहू म्हणजे हवे ते हवेच अशी वृत्ती असते.

नोकरी व्यवसाय -

तांत्रिकी, मंत्रिकीकरण विद्या, गारुडी विद्या, दारू विक्री, फोटोग्राफी, मॉडेलिंग, सापाचे विष काढ, सापाची कातडी विकणे, पाळीव प्राणी पाळण्याची आवड. कुत्रे मांजरांचे शो करणे, कुत्र्यांचे ब्रीडिंग करणे, कुत्रे विकणे, जादूगार, कडबाकुट्टी मशीन, चोर, औषध संशोधन, वनस्पती संशोधन, छापखाने, कागद, स्टेशनरी, व्यापारी, हिशोबनिस, आकाशवाणी, टीव्ही कलाकार, बँकेत काम करणारे, वैद्य आणि संशोधक असू शकतात.

रोग व आजार -

या लोकांना सर्दीचे विकार होतात. दमा, पक्षाघात, विषारी प्राण्यांपासून दंश, झोप न येणे, खोकला, गंडमाळा, गळा सुजणे, त्रिदोष कारक आजार होतात.

Ardra Nakshatra
Mercury Transit : बुधाच्या गोचरमुळे 'या' राशींना लागणार ग्रहण; आयुष्यात होणार नकोसे बदल, संकंटांचा डोंगरही कोसळणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com