

डॉ. भगवंत पवार यांनी क्रॅक केली UPSC
सोलापूरच्या लेकाचा प्रेरणादायी प्रवास
मराठी माध्यमातून शिक्षण
जिद्दीने आधी डॉक्टर अन् आता वैद्यकीय अधिकारी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अनेक परीक्षा असतात. या परीक्षा पास केल्यावर तुम्ही वेगवेगळ्या पदावर काम करतात. लोकसेवा आयोगाच्या वतीने वैद्यकीय सेवा परीक्षादेखील घेण्यात येते. याद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवड केली जाते. हीच परीक्षा सोलापूरातील लेकाने क्रॅक केली आहे. डॉ. भगवंत गणेश भागवत यांनी यूपीएससी वैद्यकीय सेवा परीक्षेत २५वी रँक मिळवली आहे. शेतकऱ्याच्या लेकाने हे यश मिळवल्याचे पाहून संपूर्ण गावकऱ्यांना आनंद झाला होता.
सोलापूरच्या लेकाची यशोगाथा
डॉ. भगवंत पवार हे करमाळा तालुक्यातील वडशिवणे गावातील रहिवासी. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सीएमएस परीक्षा पास केली. त्यांनी आधी मेडिकलचे शिक्षण घेतले त्यानंतर यूपीएससी परीक्षेसाठी तयारी केली.
डॉ. भगवंत यांचा उक्कडगावच्या चंद्रभानू सोनवणे कॉलेजच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, माझे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीतून झाले. मला नीट, एनसीइआरटी काय असते हे माहितदेखील नव्हते. परंतु आईवडिलांनी दिलेले संस्कार, काहीतरी करण्याची इच्छा आणि जिद्द यामुळे मी अभ्यास केला. मी एम्स हैदराबाद येथून वैद्यकीय शिक्षण घेतले. वैद्यकीय शिक्षण ते यूपीएसी हा प्रवास अभ्यासाच्या बळावर पूर्ण केला.
अथक परिश्रम करुन अभ्यास करण्यासाठी पर्याय नाही. अकरावी, बारावी हे वर्ष खूप महत्त्वाचे असते. मी मेडिकल ते यूपीएससीचा प्रवास पार करु शकतो तो म्हणजे आजपर्यंत मी टीव्ही पाहिला नाही. बारावी होईपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः ला टीव्हीपासून अलिप्त ठेवायला हवे.
भगवंत यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून घेतले. त्यांनी अकरावी-बारावी सोनवणे कॉलेज, उक्कडगाव येथून केले. यानंतर २०२० मध्ये नीट परीक्षेत ७२० पैकी ६४५ गुण मिळवले आणि सोलापूरमध्ये पहिले आले. यानंतर एम्स हैदराबादमधून एमबीबीएस केले. यानंतर मी यूपीएससी सीएमएस परीक्षा पास केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.