Manasvi Choudhary
अभिनेत्री गिरीजी ओक ही सुप्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. गिरीजाने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
अभिनेत्री गिरीजा ओकचा जन्म नागपूरचा असला तरी तिचे शिक्षण मुंबई आणि पुण्यात झालं आहे.
गिरीजा ओकने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा या शाळेतून पूर्ण केले .
गिरीजाने मुंबईतील 'ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स' मधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं आहे.
ग्रॅज्यूएशन पूर्ण केल्यानंतर गिरीजाने बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलं आहे.
गिरिजाने कॉलेजमधूनच अभिनयाला सुरुवात केली. तिने सुरुवातीला जाहिराती आणि थिएटर वर्कशॉपमध्ये भाग घेतला होता.
हिंदी जाहीरात, चित्रपट आणि वेबसीरिज या माध्यमातून गिरीजाने आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
गिरिजाने २०१० साली लज्जा मालिकेत काम केले होते. त्यातील गिरिजाची मानसी ही भूमिका लोकप्रिय झाली होती.