Manasvi Choudhary
तिळाचे तेल हे जेवणात नाही तर आयुर्वेदिक म्हणून केस आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते.
तिळाचे तेल केसांना लावल्याने केस पांढरे होत नाही. हे तेल नियमित लावल्यास केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो.
तिळाच्या तेलाने केसांची मालिश केल्याने हे तेल टाळूचे रक्ताभिसरण सुधारते. हे केसांच्या मुळांमध्ये खोलवर मुरते, ज्यामुळे केस वेगाने वाढतात आणि दाट होतात.
तिळाच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जर तुम्हाला कोंड्याचा त्रास असेल, तर हे तेल लावल्याने टाळूला होणारी खाज आणि संसर्ग दूर होतो.
तिळाचे तेल सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे. हे त्वचेवर एक संरक्षक थर तयार करते.
कोमट तिळाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज केल्यास त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर २-३ थेंब तिळाचे तेल लावा किंवा आंघोळीच्या अर्धा तास आधी शरीराला मालिश करा.