Manasvi Choudhary
गुलाबी रंगाची साडी ही प्रत्येक महिलेवर उठून दिसते. गुलाबी साडी एक तरी प्रत्येक महिलेच्या कपाटात असते.
पण गुलाबी साडीवर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालू शकता यामुळेचा तुमचा लूक आकर्षक दिसेल
गुलाबी आणि हिरव्या रंगाचे कॉम्बिनेशन हे सर्वात लोकप्रिय आणि पारंपारिक आहे. लग्न, पूजा कार्यक्रमानिमित्त तुम्ही खास काठपदरी साड्यांवर असे रंग निवडू शकता.
गुलाबी रंगाची स्टायलिश साडीवर तुम्ही रॉयल ब्लू किंवा नेव्ही ब्लू रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकता यामुळे तुमचा लूक मॉडर्न दिसेल.
गुलाबी साडीवर पिवळ्या रंगाचा ब्लाऊज अतिशय फ्रेश आणि उत्साही लूक देतो. तुम्ही हळदी समारंभासाठी खास हे कलर निवडू शकता.
गुलाबी साडीवर चंदेरी किंवा राखाडी रंगाचा ब्लाऊज खूपच क्लासी आणि स्टायलिश दिसतो. हा लूक संध्याकाळच्या पार्टीसाठी परफेक्ट आहे