Manasvi Choudhary
हातात पैसे घेतल्यार त्यावर एकूण किती भाषा असतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र तुम्हाला माहितीये भारतीय चलनी नोटांवर किती भाषा असतात.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनात आणलेल्या सर्व नोटेवर एकूण १७ भाषा असतात.
भारताची विविधता आणि सर्व राज्यांचे प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटांवर या भाषांचा उल्लेख केला आहे.
कोणत्याही नोटेच्या पुढील बाजूला हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा समावेश असतो.
नोटेच्या मागील बाजूस असलेल्या एका उभ्या चौकटीला लँग्वेज पॅनेल' म्हणतात जेथे १५ प्रादेशिक भाषां लिहलेल्या असतात.
तर नोट्यांचा मागील बाजूला आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या भाषा लिहलेल्या असतात.