

युट्यूबर निशा मधुलिका यांचा प्रेरणादायी प्रवास
वयाच्या ५२ व्या वर्षी सुरु केलं युट्यूब
रेसिपीचे व्हिडिओ घराघरात प्रसिद्ध
सध्याचं जग संपूर्ण डिजिटल झालं आहे. सर्वकाही ऑनलाइन आहे. जर कोणतीही गोष्ट सर्च करायची असल्यावर गुगल किंवा युट्यूबचा वापर करतात. या माध्यमातून क्रिएटर्स खूप पैसे कमावतात. तसेच युट्यूबवर व्हिडिओ बनवणे खूप अवघड असते. परंतु तुम्ही कोणत्याही वयात काहीही करु शकतात. हे युट्यूबर निशा मधुलिका यांनी दाखवून दिले. त्यांचे रेसिपीचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात.
५२ व्या वर्षी सुरु केले युट्यूब (Nisha Madhulika Start Youtube Journey at age of 52)
निशा मधुलिका या देशातील सर्वात श्रीमंत युट्यूबरपैकी एक आहेत. त्यांच्या रेसिपी या घराघरात बनवल्या जातात. त्यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी युट्यूबर होण्याच्यासाठी पहिले पाऊल उचलले.
युट्यूबद्वारे अनेकजण खूप लोकप्रिय झाले आहे. निशा मधुलिका यांचे सोशल मीडियावर १.४ कोटींपेक्षा जास्त सबस्क्राबर आहेत. त्यांनी २००७ मध्ये आपली वेबसाइट सुरु केली होती. २०११ मध्ये त्यांनी युट्यूबला सुरुवात केली.
निशा मधुलिका या सुरुवातीला गरीब मुलांना शिकवायच्या. निशा यांना फूड ब्लॉग बघून आपले स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी आपले करिअर बदलले आणि फूड ब्लॉगिंग सुरु केली. त्यांच्या चॅनलवर २,२०० पेक्षा जास्त व्हिडिओ आहे.
४३ कोटींची संपत्ती
निशा मधुलिका यांनी युट्यूबमधून खूप पैसे कमावले. मिडिया रिपोर्टनुसार, निशा मधुलिका यांची एकूण संपत्ती ४३ कोटी रुपये आहे. त्यांच्या मेहनत आणि प्रयत्नांचे यश त्यांना मिळाले. त्या नेहमी युट्यूबवर व्हिडिओ बनवतात. त्यांचे कोलॅब्रेशन किंवा जाहिरातींमधूनही त्यांना खूप पैसे मिळतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.