

IAS ऋत्विक वर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास
दोनदा UPSC क्रॅक
IPS ट्रेनिंगदरम्यान झाली IAS पदावर निवड
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करणे खूप कठीण असते. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अनेकजण तर लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी करताना आपण पाहिले आहे. यूपीएससी परीक्षा पास करुन काहीजण आयपीएस बनतात तर काहीजण आयएएस अधिकारी होतात. दरम्यान, ऋत्विक वर्मा यांनी आयपीएसचे ट्रेनिंग करता करता आयएएस पदाला गवसणी घातली आहे. त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.
ऋत्विक वर्मा यांचा प्रवास (IAS Ritwik Verma Success Story)
ऋत्विक वर्मा हे मूळचे झारखंडच्या जमशेदपूरचे रहिवासी आहेत. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण जमशेदपूर येथे पूर्ण केले. ऋत्विक हे लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी इंटरमीडिएट डिग्री प्राप्त केल्यानंतर दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.
IPS चे ट्रेनिंग सुरु असतानाच IAS पदासाठी निवड
ऋत्विक वर्मा यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी ५२० रँक प्राप्त केली. त्यांची आयपीएस पदावर निवड झाली. परंतु ऋत्विक यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. ते आयपीएसचे ट्रेनिंग घेत असतानाच त्यांनी परीक्षा दिली आणि पासदेखील झाले. त्यांनी २०२४ मध्ये यूपीएससी सीएसई परीक्षा पास केली. त्यांनी ११५ रँक मिळवली. त्यांची आयएएस (IAS) पदासाठी निवड झाली.
काय प्रेरणा मिळाली?
ऋत्विक वर्मा यांचा हा प्रवास आपल्याला मेहनत करण्यास प्रोत्साहन देतो. जर तुम्ही मेहनत घेतली तर तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण करु शकतात. अनेकदा अपयश येते किंवा आपल्या ध्येयापासून थोडं मागे यावं लागतं. परंतु तरीही आपले कष्ट सोडायचे नाही. तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.