

शेतकऱ्याच्या मुलींचा प्रेरणादायी प्रवास
पाचही बहिणींनी क्रॅक केली RAS
पाचही बहिणी झाल्या सरकारी अधिकारी
जर इच्छाशक्ती आणि मेहनत करायची ताकद असेल तर तुम्ही काहीही करु शकतात. असंच काहीसं शेतकऱ्याच्या लेकींनी केलं आहे. शेतकऱ्याच्या पाचही लेकींनी सरकारी नोकरी मिळवली आहे. त्या RAS ऑफिसर बनल्या आहेत. त्यांनी सगळ्या परिस्थितींवर मात करत यश मिळवले आहे. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
राजस्थानच्या हनुमानगड या जिल्ह्यातील भेरुसरी या गावातील रहिवासी आहेत. शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेल्या या बहिणींना राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षा पास केली.
आपल्या पाचही मुली प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. याचा त्यांच्या आईवडिलांना खूप अभिमान आहे. या मुलींचे आईवडिल भलेही अशिक्षित होते परंतु त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहित होतं. ते स्वतः शिक्षित नसले तरीही त्यांनी त्यांच्या पाचही मुलींना आयआरएस अधिकारी केलं. त्यांच्या या यशाचं श्रेय त्यांच्या वडिलांना जातं. त्यांनी नेहमीच मुलींना प्रेरणा दिली.
शेतकरी कुटुंबाकडे खूप कमी जमीन होती. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागले. चांगले पीक मिळत नव्हते. त्यामुळे आर्थिक परिस्थितीदेखील बेताची होती. ते मुलींच्या शाळेची फीदेखील भरु शकत नव्हते. अशा परिस्थितीतही त्यांच्या मुलींनी अभ्यास केला.
पाचही मुली झाल्या प्रशासकीय अधिकारी (5 Sisters Become Government Officer)
पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांच्या मोठ्या मुली रोमा आणि मंजु यांनी सरकारी नोकरीची तयारी केली. २०१० मध्ये रोमा यांनी परीक्षा पास केली. त्यानंतर २०१७ मध्ये मंजुनेही परीक्षा पास केली. दोन्ही मोठ्या बहिणी सरकारी अधिकारी झाल्यानंतर त्यांच्या तिन्ही लहान बहिणींना सरकारी नोकरीची तयारी केली.अंशू आणि सुमन यांनी २०१८ मध्ये आरएएस परीक्षा पास केली. त्यानंतर रितू यांनी २०२१ मध्ये परीक्षा पास केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.