

सरकारी कंपनीत नोकरीची संधी
नालको कंपनीत भरती सुरु
कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी
सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नालको कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नालको म्हणजे नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO). ही भारत सरकारची कंपनी आहे. सरकारच्या नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील पीएसयू कंपनी आहे. ही कंपनी अॅल्युमिनियम उत्पादनाचे काम करते.
इंजिनियर पदासाठी भरती
नालको कंपनीत ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मेकॅनिकल इंजिनियरसाठी ५९ जागा आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी २७ तर केमिकल इंजिनियरसाठी २४ जागा आहेत. एकूण ११० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
सरकारी कंपनीतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २ जानेवारीपासून सुरु झाली आहे. या योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी या कालावधीत nalcoindia.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
पगार (Salary)
नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमधील नोकरीसाठी निवड झाल्यावर ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. उमेदवारांची निवड GATE-2025 स्कोअरवर आधारित होणार आहे. यानंतर शॉर्टलिस्टेड उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून फुल टाइम मेकॅनिकल इंजिनियरिंग ,इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग/पॉवर इंजीनियरिंग/इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग/केमिकल इंजीनियरिंग/एमटेक डिग्री प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे स्कोअरकार्डदेखील असावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.