प्रत्येकाच्या मनात काहीना काही स्वप्ने असतात. मनात जिद्द असेल तर आयुष्यातली सगळे स्वप्न पूर्ण होतात. याबरोबर स्वप्न पूर्ण करताना आपल्या वाटेला अनेक संकटे येत असतात. पण आयुष्याच्या प्रत्येक संकटावर मात करुन अनेक नागरिक यशाच्या शिखरावर पोहचतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही नागरिक दिवसरात्र मेहनत करत असतात. असच एक यश एका गरीब घरातील मुलीने मिळवलं आहे. जाणून घेऊया तिच्या यशाचा संपूर्ण प्रवास.
आयुष्यात आपल्या वाटेला अनेक स्पर्धा परीक्षा येत असतात. या स्पर्धा परिक्षांमध्ये खूप मेहनत करुन काही नागरिक उत्तीर्ण होतात. असच एक स्वप्न अमिता प्रजापतीने पूर्ण केलं आहे. अमिता प्रजापती ही दिल्ली शहरात झोपडपट्टी परिसरात राहणारी आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असून तिने जिद्दीने आपले सीए स्वप्न पूर्ण केले आहे. तिच्यासाठी सीए प्रवास खूप कठीण होता. तिने अनेक संकटावर मात करुन हे यश मिळवले आहे.
अमिताच्या वडिलांचा चहाचा व्यवसाय होता. तिचे वडील दररोज सकाळी येणा-जाणाऱ्या नागरिकांना चहा विकायचे. अमिताच्या वडिलांना अनेक नागरिक नेहमी बोलायचे, की तू चहा विकून मुलीला कसं शिकवणार? या एवजी तू चहाचे दुकान विकून एक घर घेऊन घे. मनात जिद्द आण वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असल्याने तिने हे स्वप्न पूर्ण केले. माझ्या वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मी हे स्वप्नं पूर्ण करु शकले आहे. आज तिच्या उत्तम यशामुळे तिने सीए परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अमिताला सीए बनण्यासाठी १० वर्ष कठोर परिश्रम करावे लागले आहे. तिचा हा संपूर्ण प्रवास लांखो विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श बनला आहे.