

आयएएस जोडप्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
आयएएस भारती दीक्षित यांचे पती आशिष मोदींवर गंभीर आरोप
पिस्तुलाच्या धाकावर घटस्फोटासाठी दबाव करत असल्याचा आरोप
पोलिसांकडून तपास सुरू
राजस्थानमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने प्रशासकीय कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील एका आयएएस जोडप्याचा घरगुती वाद चव्हाट्यावर आला आहे. आयएएस पती परपुरूषाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करतोय, असा गंभीर आरोप आयएएस पत्नीने केला आहे. या प्रकरणी एसएमएस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
२०१४ सालच्या बॅचच्या आयएएस भारती दीक्षित आणि आएएस आशिष मोदी यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. भारती दीक्षित यांनी पती आशिष मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. वरिष्ठ आएएएस भारती दीक्षित यांनी ७ नोव्हेंबर रोजी एमएमएस पोलिस स्टेशनमध्ये नवऱ्याच्या विरोधात तक्रार दिली.
'नवरा घरात दारू पिऊन मोठा राडा करतो. नवरा आशिष परपुरूषाशी अनैतिक संबंधासाठी भाग पाडत असल्याचा आरोप पत्नी भारती यांनी केला आहे. पिस्तुलाच्या धाकावर ओलिस ठेवून घटस्फोटासाठी दबाव टाकतो, असा आरोप पत्नी भारती यांनी केला आहे.
दोन्ही आयएएस हे राजस्थानचे कॅडर अधिकारी आहेत. भारती दीक्षित या राजस्थान सरकारच्या संयुक्त सचिव पदावर कार्यरत आहे. तर आशिष मोदी या सामाजिक न्याय विभागात संचालक पदावर कार्यरत आहे. या दोघांचा वाद थेट पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. या प्रकरणात आएएस अधिकारी आशिष मोदी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी संपूर्ण तपास केल्यानंतर नवे खुलासे समोर येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.