

आंबेजोगाई तालुक्यातील रामप्रभू बलभीम सातपुतेंनी केली MPSC क्रॅक
उसतोड कामगाराचा लेक झाला PSI अधिकारी
गावातील लोकांनी केला सत्कार
मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणीही काहीही करु शकते. तुम्ही मेहनतीच्या जोरावर कोणतीही परिस्थिती बदलू शकतात. हे अंबाजोगाई तालुक्यातील पोलेवाडी येथील रामप्रभू बलभीम सातपुते यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
एका ऊसतोड कामगाराच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश मिळवलं आहे. त्यांनी 'पोलीस उपनिरीक्षक' (PSI) पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण अंबाजोगाई तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऊस तोड कामगाराचा मुलगा हा आता सरकारी अधिकारी झाला आहे. त्यांच्या यशामुळे कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे.
कौटुंबिक परिस्थिती बेताची
रामप्रभू यांचे वडील बलभीम गोपीनाथ सातपुते हे ऊसतोड कामगार आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे.२०१० मध्ये रामप्रभू यांच्या मोठ्या भावाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या संकटामुळे कुटुंब खचले होते, मात्र अशा कठीण काळातही सातपुते कुटुंबाने रामप्रभू यांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
रामप्रभु यांनी प्राथमिक शिक्षण पोलेवाडी (जि. प. शाळा) शाळेतून घेतले. यानंतर १०वीपर्यंतचे शिक्षण पठाण मांडवा येथून केले. त्यांनी उच्च शिक्षण अंबाजोगाई येथून केले. त्यांनी डी.एड. (D.Ed) पूर्ण केले.
शिक्षक भरती रखडल्याने MPSC दिली
शिक्षक भरती प्रक्रिया रखडल्यामुळे रामप्रभू यांनी वेळ वाया न घालवता एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पुण्यात किंवा मोठ्या शहरात जाऊन क्लास लावण्याची परिस्थिती नव्हती. तरीही त्यांनी जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. 2023 च्या परीक्षेत त्यांनी घवघवीत यश मिळवले. 12 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर रामप्रभू सातपुते यांची नियुक्ती आता अमरावती येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.